मुंबईची खबर: 402 घरांसाठी म्हाडाची बंपर लॉटरी! तुमच्या स्वप्नातलं घर मिळवा अगदी स्वस्तात...

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या नाशिक मंडळाकडून 402 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या घरांची किंमत 14 लाख रुपये 36 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे.

तुमच्या स्वप्नातलं घर मिळवा अगदी स्वस्तात...

तुमच्या स्वप्नातलं घर मिळवा अगदी स्वस्तात...

मुंबई तक

07 Dec 2025 (अपडेटेड: 07 Dec 2025, 05:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

402 घरांसाठी म्हाडाची बंपर लॉटर!

point

तुमच्या स्वप्नातलं घर मिळवा अगदी स्वस्तात...

Mumbai News: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) च्या नाशिक मंडळाकडून 402 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या घरांची किंमत 14 लाख रुपये 36 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी वांद्रे मुख्यालयात लॉटरीसाठी ऑनलाइन अॅप्लिकेशनला सुरूवात केली आहे. नाशिक बोर्डाने 2025 मध्ये पहिल्या तीन लॉटऱ्यांद्वारे 846 घरे विकली आहेत आणि कमी दरात घरांची ऑफर देणारी ही चौथी लॉटरी निघाली आहे. 

हे वाचलं का?

नाशिक बोर्डाकडून चौथी लॉटरी 

वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना संजीव जयस्वाल म्हणाले की, 2025 मध्ये नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने या लॉटरीपूर्वी तीन फ्लॅट लॉटरीच्या माध्यमातून 846 फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. 2025 मध्य म्हाडा नाशिक बोर्डाकडून आयोजित करण्यात आलेली ही चौथी लॉटरी आहे आणि या माध्यमातून स्वस्त दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाचे प्रयत्न आहेत. या स्कीमअंतर्गत लॉटरी जिंकणाऱ्या अर्जदाराला घराची रक्कम 5 हप्त्यांमध्ये भरावी लागणार आहे. 

नाशिक बोर्डाकडून जाहीर केलेल्या या लॉटरीमध्ये कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी एकूण 293 फ्लॅट्सचा समावेश आहे. यामध्ये चुंचाळे येथे 138 फ्लॅट, पाथर्डीमध्ये 30 फ्लॅट, मखमलाबादमध्ये 48 फ्लॅट आणि आडगाव येथे 77 फ्लॅटचा समावेश आहे. तसेच, मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी एकूण 109 फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, यामध्ये सातपूर येथे 40 फ्लॅट, पाथर्डी येथील 35 फ्लॅट आणि आडगावमध्ये 34 फ्लॅट्सचा समावेश आहे. या फ्लॅट्सची किंमत जवळपास 14,94,023 रुपये ते 36,75,023 रुपयांपर्यंत आहे. 

हे ही वाचा: Govt Job: टेक्निकल क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! STPI मध्ये नवी भरती, किती मिळेल पगार?

कसा कराल अर्ज? 

यासाठी इच्छुक असलेल्यांनी https://housing.mhada.gov.in या https://mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन  ऑनलाइन अर्ज करा. रजिस्ट्रेशन आणि अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. तसेच, ठेवीची रक्कम 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन भरता येईल. 24 डिसेंबर 2025 रोजी बँक कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटी द्वारे ठेवीची रक्कम भरता येईल. सोडतीसाठी स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची ड्राफ्ट यादी 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 03:00 वाजता प्रकाशित केली जाईल.

हे ही वाचा: वर्धा: घरात आई-वडिलांचे सतत वाद... डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!

दाव्यांचे निवारण झाल्यानंतर, अंतिम यादी 6 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता प्रकाशित केली जाईल. सोडतीची तारीख, वेळ आणि ठिकाण वेबसाइटवर स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल. या लकी ड्रॉसाठी अप्लाय करण्यासाठी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत उत्पन्नाचं सर्टिफिकेट जमा करावं लागेल. 

    follow whatsapp