पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका

मुंबई तक

• 11:33 AM • 01 Mar 2026

Pimpri-Chinchwad News : मध्य-पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना बसला असून, 'इंदिरा इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ बिझनेस'चे 84 विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत.

Pimpri-Chinchwad News

Pimpri-Chinchwad News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले

point

इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका

Pimpri-Chinchwad News : मध्य-पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा मोठा फटका पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना बसला असून, 'इंदिरा इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ बिझनेस'चे 84 विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : खामेनी, मुलगी-जावई-सून, टॉप कमांडर...इस्त्राईल आणि अमेरिकेने टिपून-टिपून मारले

अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते दुबईला

इंदिरा इन्स्टिट्यूटचे हे सर्व विद्यार्थी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी दुबईला गेले होते. त्यांचा हा दौरा पूर्ण करून ते रविवारी रात्री भारतात परतणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव दुबईतील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना मायदेशी परतता आले नाही.

हे ही वाचा : जळगाव : प्रेम संबंधातून विवाहितेच्या डोक्यात गोळी घालून स्वतःलाही संपवलं, मुलीनं दार उघडून पाहताच...

दुबईत तणावाचे वातावरण

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. इराणने केवळ लष्करी तळांनाच नव्हे, तर दुबईतील काही ठिकाणांनाही लक्ष्य केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणकडून करण्यात आलेल्या काही हल्ल्यांमुळे दुबईत सध्या भीती आणि तणावाचे वातावरण आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणे रद्द केली आहेत.