Govt Job: IIT चं शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षणासोबत कामाचा अनुभव मिळवायचा असेल तर उमेदवार IIT गांधीनगर इंटर्नशिपमध्ये सहभागी होऊ शकतात. आयआयटी (IIT) गांधीनगरकडून समर रिसर्च इंटर्नशिप प्रोग्राम (SRIP) साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून उमेदवार 5 मार्च 2025 पर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार पात्र असून srip.iitgn.ac.in या वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
ADVERTISEMENT
'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर'कडून निघालेली ही इंटर्नशिप भरती उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. या इंटर्नशिपचा कालावधी 2 महिने उमेदवारांना प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याचा अनुभव मिळेल.
काय आहे पात्रता?
आयआयटी 2026 च्या या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये इंजीनिअरिंग, विज्ञान आणि समाजशास्त्र सारख्या विषयांचं शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याच शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
हे ही वाचा: पुणे : पिंपरी-चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इराणने दुबईवर केलेल्या हल्ल्याचा फटका
किती मिळेल स्टायपेंड?
या इंटर्नशिपचा कालावधी 2 महिने असून 7 मे ते 16 जुलै या 8 आठवड्यांच्या काळात उमेदवार इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण करू शकतात. या काळात, उमेदवारांना दर आठवड्याला 2000 रुपये स्टायपेंड दिलं जाईल. याचाच अर्थ, 2 महिन्यांच्या कालावधीत उमेदवारांना एकूण 16,000 रुपये स्टायपेंड मिळेल. यासह उमेदवारांना आयआयटी गांधीनगरच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा देखील दिली जाईल.
हे ही वाचा: मोठी बातमी! नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर 18 जखमी
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम srip.iitgn.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. आता Guidlines मध्ये इंटर्नशिपशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
3. त्यानंतर, उमेदवारांनी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती योग्यरित्या भरा.
4. माहिती भरल्यानंतर, फोटो आणि सही स्कॅन करून दिलेल्या साइजमध्ये अपलोड करा.
5. शेवटी, सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून फॉर्म ऑनलाइन सबमिट करा.
भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT











