Maharashtra Weather : मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट, उष्णतेचा पारा वाढणार तर...

Maharashtra Weather : राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढलेला आहे. मार्च महिन्यात देखील पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हे 2-4 अंशांनी वाढून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 मार्च रोजी मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली. 

Mharashtra weather

Mharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 01 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढला

point

मार्च महिन्याची स्थिती काय?

Maharashtra Weather : राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढला आहे. मार्च महिन्यात देखील पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हे 2-4 अंशांनी वाढून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 मार्च रोजी मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी AAIB चा महत्त्वाचा अहवाल आला समोर, नेमकं काय घडलं?

कोकण :  

कोकण विभागातील मुंबई,ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान उष्ण आणि दमट कायम राहील असा अंदाज आहे. मुंबई शहराचा विचार केल्यास कमाल तापमान हे 29-32 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान हे 23-25 अंश राहण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथे हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे.  तसेच पुणे शहरात देखील अशी स्थिती जाणवेल. 

मराठवाडा :  

मराठवाडा विभागातील बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. 

हे ही वाचा : "राजआश्रय… कुणाला? आम्हा / तुम्हा",वाल्मिक कराडच्या मुलाची आणखी एक खळबळ उडवणारी पोस्ट

विदर्भ : 

विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा येथे अधिक तापमान राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

    follow whatsapp