Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील हवामान हे बहुतेक कोरडं आणि उष्ण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोणत्याही प्रकारे पावसाची शक्यता नाही, तसेच विदर्भात पूर्ण आणि पश्चिम भागात काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील बहुतांश विभागात आकाश स्वच्छ आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'सर्वांसमोर सर्व काही...' वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडिया पोस्ट, बीड पुन्हा चर्चेत
राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज
मुंबई आणि कोकणातील उत्तर कोकण, दक्षिण कोकण , उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात वातावरण पूर्णपणे कोरडं राहण्याची शक्यता आहे. या विभागात एकूण तापमानात काही प्रमाणात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
कोकण : कोकणात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारी तापमानात वाढ होईल असा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र: मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच आकाश स्वच्छ राहील.
मराठवाडा : मराठवाडा विभागात ही हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ : विदर्भात हवामान काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : 'अजितदादांच्या अपघातात काहीतरी काळंबेरं...' राज ठाकरेंच्या मनात संशयाची पाल?
एकंदरीत राज्यात विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढील काही तास महत्त्वाचे असतील हवामान विभागाचा अंदाज आहे. काही विभागात हवामान कोरडं राहून दुपारी उष्णतेचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT











