Govt Jobs : भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

मुंबई तक

06 Jun 2026 (अपडेटेड: 06 Jun 2026, 04:21 PM)

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भव्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

Government Jobs

Government Jobs

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : भारत पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी

point

'असा' करा अर्ज

Government Jobs : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मध्ये विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भव्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने टीम मेंबर/टीम लीडर (एक्सप्लोरेशन व ॲसेट मॅनेजर), रिझर्व्हॉयर इंजिनिअर, कंपनी सेक्रेटरी, फायनान्स टीम मेंबर, हेड सेल्स, टेक्निकल ऑफिसर आणि हायवे रेस्ट स्टॉप्स (WSA) साठी टीम लीड व साइट मॅनेजर अशा विविध जबाबदार पदांचा समावेश आहे. देशातील नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत करिअर करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आला आहे. तांत्रिक व व्यवस्थापकीय पदांसाठी संबंधित विषयात 60% गुणांसह बी.ई./बी.टेक, सीए/आयसीडब्ल्यूए (CA/ICWA), आयसीएसआय (ICSI) कडून कंपनी सेक्रेटरी पात्रता, किंवा बिझनेस, हॉस्पिटॅलिटी व रिटेल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी गुणांमध्ये 5% ची सूट देण्यात आली आहे. याशिवाय, पदानुसार किमान 4 वर्षांपासून ते कमाल 21 वर्षांपर्यंतच्या कामाच्या अनुभवाची अट ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा : नांदेड : मामाच्या गावी जाताना चिमुकला कारखाली चिरडला, आई अन् बापाच्या डोळ्यादेखत...

वयाची अट

उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2026 रोजी गृहीत धरले जाईल. पदानुसार वयोमर्यादा 34 वर्षांपासून ते कमाल 50 वर्षांपर्यंत ठरवण्यात आली असून, शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 03 वर्षांची सवलत लागू असेल. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

हे ही वाचा : जंतर-मंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात काय घडतंय? दीपके काय म्हणाले?

अर्जाची शेवटची तारीख

या भरतीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून आहे. परीक्षा शुल्काचा विचार केल्यास जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1180 रुपये शुल्क असून, अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी भारत पेट्रोलियमच्या www.bharatpetroleum.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज सादर करावेत.