Beed crime : योगेश काशीद - लग्नाला केवळ 13 दिवस झाल्यानंतर गणेश दत्तू कोळी नावाच्या तलाठ्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. हा धक्कादायक प्रकार आंबाजोगाई शहरालगच्या मोरेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी फिर्यादीवरून आई सुनंदा दत्तू कोळी यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. पत्नीचे अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा गणेशच्या आईने आरोप केला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अंबरनाथ : कोब्राच्या दंशाने 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, रुग्णालयात उडाला गोंधळ
मर्जीविरूद्ध लग्न झाल्याचा पत्नीचा दावा
दरम्यान, या प्रकरणात आईने फिर्यादीत तक्रार नोंद केली की, लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असता, पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले होते. पत्नीने हे लग्न आपल्या मर्जीविरूद्ध झाल्याचे सांगितले. तिने पुढे गणेशसोबत राहण्यास नकार दिला, नंतर ती अंबाजोगाईला निघून गेली. गणेश नंतर आपल्या पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी अंबाजोगाईकडे आला होता. 25 मे रोजी च्याने बहिणीला फोन करत सांगितलं की, पत्नीचे दुसऱ्याच मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने तिच्या डायरीत लिहून ठेवले. याचवरून त्यांच्याच मोठा वाद झाला होता. काही वेलानंतर गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
हे ही वाचा : स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...
अनैतिक प्रेमसंबंधातून लग्नानंतर 13 दिवसांतच नवऱ्यानं संपवलं जीवन
गणेश हा 2021 मध्ये पोलीस दलात शिपाई होता. नंतर त्याने तलाठी परीक्षेचा देखील अभ्यास केला. 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून त्यांनी नियुक्ती मिळवली होती. 13 मे रोजी गणेश दत्तू कोळीचा विवाह बीड येथील तरुणीशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. मात्र, पत्नीच्या अनैतिक प्रेमसंबंधातून लग्नानंतर 13 दिवसांतच गणेशनं जीवन संपवलं.
ADVERTISEMENT











