Ambernath Snack : अंबरनाथमधील शिवमंदिर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका घरात शिरलेल्या कोब्रा सापाने तीन वर्षीय चिमुकल्याला दंश केला, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी उल्हासनगर येथील जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याच्या आरोपातून चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. याच घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : स्वयंपाक करण्याच्या बहाण्याने तरुणीला घरात बोलावले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून...
सापाच्या दंशाने 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, सुलतान शेख (वय 3) हा चिमुकला घरात मोबाईल पाहत होता, त्याचदरम्यान त्याच्या कमरेला विषारी सापाने दंश केला होता. साप चावल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी त्याला तातडीने उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
उपचारादरम्यान अतिघाई अन् चिमुकल्याचा मृत्यू
मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. डॉक्टरांनी उपचार करताना अधिक अतिघाई केल्याने मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला. त्यांच्या म्हणण्यांनुसार, रुग्णालयात केवळ रक्त तपासणी केली, मात्र आवश्यक ते उपचार दिले गेले नाहीत.
पुराव्यासाठी संबंधित सापालाही रुग्णालयात आणण्यात आले होते, पोलिसांनी हस्तक्षेप केला असता, तेव्हा दोघांमध्ये मोठा शाब्दिक वाद घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
हे ही वाचा : नांदेड : मामाच्या गावी जाताना चिमुकला कारखाली चिरडला, आई अन् बापाच्या डोळ्यादेखत...
दुसरीकडे उल्हासनगर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी कुटुबीयांचे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मुलाला रूग्णालयात आणल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टरांच्या पथकाने त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी ठरले नाही. संबंधित घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
ADVERTISEMENT












