Maharashtra Weather : 'या' विभागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज, 25 जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 07 Jun 2026

Maharashtra Weather : राज्यात रविवारी काही विभागांत पावसाचा अंदाज राहील अशी शक्यता आहे. एकूण 25 जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात रविवारी काही विभागांत पावसाचा अंदाज राहील

point

एकूण 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात रविवारी काही विभागांत पावसाचा अंदाज राहील अशी शक्यता आहे. एकूण 25 जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात कोकण 3, उत्तर महाराष्ट्र 2, पश्चिम महाराष्ट्र 5, मराठवाडा 4 आणि विदर्भ 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वाऱ्याचा वेग वाढेल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाहीच, पुढचा नेमका प्लॅन काय?

कोकण 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच किनारी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला. याच जिल्ह्यांना काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाची शक्यता आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. तसेच घाटमाथा तसेच काही शहरी भागांत मध्यम स्वरुपाच्या पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा या विभागातील धाराशिव, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. याच भागांत काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात. 

हे ही वाचा : अंबरनाथ : कोब्राच्या दंशाने 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, रुग्णालयात उडाला गोंधळ

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या एकूण जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही विभागात विजेसह पावसाची दाट शक्यता आहे.