Govt Job: मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मुंबईकडून नॉन-टीचिंग पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या या भरतीसाठी उमेदवारांसाठी कोणत्याही लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार नाही. थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 10 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
IIM च्या या भरतीअंतर्गत असोसिएट मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती आहे. पुढील पदांसाठी IIM मुंबईत निघाली भरती.
असोसिएट मॅनेजर (सिव्हिल)
असोसिएट मॅनेजर (इलेक्ट्रिकल)
असोसिएट मॅनेजर (आयटी सिस्टिम/ एनालिस्ट)
असिस्टंट मॅनेजर (सिव्हिल)
असिस्टंट मॅनेजर (MEP)
सीनिअर हिंदी ट्रान्स्लेटर
जुनिअर हिंदी ट्रान्स्लेटर
शैक्षणिक पात्रता
असोसिएट मॅनेजर पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित इंजीनिअरिंग शाखेत किमान 60 टक्के गुणांसह बॅचलर्स डिग्री आणि 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच, असिस्टंट मॅनेजर पदांसाठी उमेदवारांकडे किमान 55 टक्के गुणांसह इंजीनिअरिंग डिग्री किंवा 60 टक्के गुणांसह डिप्लोमा तसेच संबंधित क्षेत्रात अनुभव असणं गरजेचं आहे. यासोबतच, सीनिअर हिंदी ट्रान्स्लेटर पदासाठी हिंदी किंवा इंग्रजी विषयात मास्टर्स डिग्रीसह 2 वर्षांचा अनुभव आणि जूनियर हिंदी ट्रान्स्लेटर पदासाठी मास्टर्स डिग्रीसह 2 वर्षांचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स अनिवार्य आहे.
हे ही वाचा: अमरावती: दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद... रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून
वयोमर्यादा
असोसिएट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वय 40 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, असिस्टंट मॅनेजर पदासाठी कमाल वय 35 वर्षे आहे. याशिवाय, सीनिअर हिंदी ट्रान्स्लेटरसाठी उमेदवारांसाठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. IIM च्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना 590 रुपये शुल्क भरावं लागणार असून एसटी (ST), एससी (SC) प्रवर्गातील आणि अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही.
शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार असून यासाठी कोणतीही लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही. या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना लेव्हल-06 ते 08 अंतर्गत वेतन दिलं जाईल.
ADVERTISEMENT











