कोल्हापूर : कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल

Kolhapur News : बसवन बागेवाडी येथील रहिवासी शिवनगौड बिरादार यांनी बसवन बागेवाडी पोलिस ठाण्यात काडसिद्धेश्वर महाराजांविरोधात तक्रार दिली होती.

Kolhapur News

Kolhapur News

मुंबई तक

08 Dec 2025 (अपडेटेड: 08 Dec 2025, 08:55 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल

point

गुन्हा शून्य क्रमांकाने जत पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलाय

जत (जि. सांगली) : बिळूर (ता. जत) येथे झालेल्या एका प्रवचनादरम्यान लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कणेरी (जि. कोल्हापूर) येथील मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली असून समाजातही संतापाची लाट उसळली आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणाची सुरुवात कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात झाली. बसवन बागेवाडी येथील रहिवासी शिवनगौड बिरादार यांनी बसवन बागेवाडी पोलिस ठाण्यात काडसिद्धेश्वर महाराजांविरोधात तक्रार दिली होती. त्यांच्या फिर्यादीची नोंद करून हा गुन्हा शून्य क्रमांकाने जत पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला. जत पोलिसांनी तक्रार मिळताच प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : बीड: "तू लय माजलास..." जातीवाचक शिवीगाळ करत ग्रामरोजगार सेवकाला बेदम मारहाण! दोन्ही पाय मोडले अन्...

फिर्यादीत नमूद केले आहे की, 9 नोव्हेंबर रोजी बिळूरमधील विरक्त मठ आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात महाराजांनी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे लिंगायत समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली. समाजात द्वेष निर्माण करणे, शांततेत व्यत्यय आणणे आणि एकोप्याला बाधा निर्माण करणे असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लिंगायत समाजात या वक्तव्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवचनात काय वक्तव्य झाले, त्याचा संदर्भ काय होता, याचा तपास करण्यासाठी कार्यक्रमाचे व्हिडिओ फुटेज, उपस्थितांकडील साक्ष आणि घटनास्थळी मिळणारे पुरावे पडताळले जात आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असून संबंधित कलमांनुसार पुढील चौकशी केली जाईल.

या घडामोडींमुळे धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता आणि सीमाभागातील समाजराजकारण अशा अनेक स्तरांवर चर्चा होते आहे. लिंगायत समाजातील काही कार्यकर्त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली असून या प्रकरणाचे समाधानकारक निराकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इचलकरंजीत तरुणाचा खून, हत्येनंतर हल्लेखोराचं 'सूरज ढलता है, डुबता नही' स्टेट्स, हादरवणारं प्रकरण

    follow whatsapp