गडचिरोली : परिचारिकेची वेतनवाढ रोखली, शरीरसुखाच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून छळ; शेवटी टोकाचा निर्णय..

मुंबई तक

08 Dec 2025 (अपडेटेड: 08 Dec 2025, 12:49 PM)

Gadchiroli Crime : परिचारिकेची वेतनवाढ रोखली, शरीरसुखाच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून छळ; शेवटी आत्महत्येच्या प्रयत्नाने गडचिरोलीमध्ये खळबळ

Gadchiroli Crime

Gadchiroli Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गडचिरोली : परिचारिकेची वेतनवाढ रोखली

point

शरीरसुखाच्या मागणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून छळ; शेवटी टोकाचा निर्णय..

Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागात काम करणाऱ्या एका परिचारिकेने दीर्घकाळ चाललेल्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने दोन वर्षांपासून सतत मानसिक त्रास देत अश्लाघ्य मागण्या केल्या, तसेच तिची वेतनवाढ मुद्दाम रोखून ठेवली, असा गंभीर आरोप तिच्या पतीने केला आहे. 6 डिसेंबरच्या सायंकाळी या दबावाला कंटाळून तिने विष पिल्याचे माहिती समोर आलीये. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

घटनेच्या दिवशी परिचारिका नेहमीप्रमाणे दिवसभर कर्तव्य बजावत होती. संध्याकाळी ती मुलचेरा येथील घरी परतल्यानंतर ती प्रचंड तणावात दिसत असल्याचे तिच्या पतीने सांगितले. घरातील जेवण आटोपल्यानंतर पतीला डुलकी लागताच तिने विषारी द्रव प्राशन केले. वेळेत ही बाब लक्षात आल्याने पतीने तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यातील 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवले, खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचे 9 कोटी थकीत

या परिचारिकेचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल आरोग्य विभागात आधीपासूनच नाराजी असल्याचे समोर आले आहे. पाच महिन्यांपूर्वी मुलचेरा तालुक्यात डेंगूच्या साथीच्या काळात उपचारातील निष्काळजीपणामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही त्याच अधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले होते. मात्र वरिष्ठांच्या पाठबळामुळे कोणतीही कारवाई न झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होती. त्यामुळे या नव्या प्रकरणाने कर्मचाऱ्यांमध्ये रोष अधिक वाढला आहे.

अदिवासीबहुल आणि नक्षलवादप्रभावित भागात सेवा करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांवर होणारा मानसिक आणि शारीरिक छळ रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आता होत आहे.

घटनेनंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली. परिचारिका उपचारात असल्याने संवाद होऊ शकला नाही, मात्र तिच्या पतीकडून संपूर्ण माहिती घेतली. उपलब्ध चॅट आणि इतर पुराव्यांवर आधारित सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्याची माहिती सीईओंनी दिली आहे. आरोग्य विभागाने अद्याप या प्रकरणात अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा आता प्रशासन काय निर्णय घेते आणि आरोपी अधिकाऱ्यावर ठोस कारवाई होते का, याकडे लागल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

राज्यातील 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवले, खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचे 9 कोटी थकीत