Maharashtra Weather: कोकणासह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात बरसणार जोरदार

Maharashtra Weather Today: राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही भागांमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. 

maharashtra weather

maharashtra weather

मुंबई तक

• 06:00 AM • 29 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर

point

जाणून घ्या 29 जुलै रोजी हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार, राज्यात 29 जुलै रोजी राज्यातील हवामानात बदल होईल. यंदाचा मान्सून सध्या सक्रिय असून राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर आणि तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Extramariital Affairs पती रिक्षा चालवून कुटुंबाचं भरायचा पोट, पत्नी लहान मुलांना घराबाहेर खेळायला सांगायची, घरात परपुरूषासोबत...

कोकण : 

कोकण किनारपट्टीवर 29 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम असणार आहे. समुद्रकिनाऱ्यावरील वाऱ्याचा वेग हा 40-50 राहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तसेच पुण्यात 28.8 अंश तापमान ते 30.8 अंश सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे.

मराठवाडा : 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या मान्सूनची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात यंदा मान्सूनचा जोर कमी आहे. याची शेतकऱ्यांना चिंता निर्माण होईल, अशी शक्यता आहे. 

हेही वाचा : आनंद लुटण्यासाठी तरुण गेला धबधब्यावर, वेगाने वाहत होता पाण्याचा प्रवाह, पाय सटकला अन् थेट 60-65 फूट खोल दरीत...

विदर्भ : 

विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा मान्सून अपेक्षित असणार आहे. तर काही ठिकाणी जोराचा पाऊस दाखल होणार असल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तापमान 32° सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु पावसामुळे आर्द्रता वाढेल, ज्यामुळे उकाडा जाणवेल.

    follow whatsapp