Love Affair Shocking Viral News : प्रेमात कोणावरही अजिबात विश्वास ठेऊ नये, असं म्हणतात. कारण अनेक लोग प्रेमप्रकरणात पार्टनरचा वापर करून घेतात आणि त्यानंतर त्याला सोडून जातात. झारखंडच्या रांचीतही एका नर्ससोबत धक्कादायक घटना घडली. एका फार्मसिस्ट आणि नर्सचं अफेअर सुरु होतं. दोघांमध्ये संबंधही झाले. पण नंतर त्याच फार्मासिस्टने त्याच्या प्रेयसीला धोका दिला. यामुळे नर्सला मोठा धक्का बसला असून ती न्यायाची मागणी करत आहे.
ADVERTISEMENT
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, अरगोडा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी फार्मसिस्टला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. रिपोर्टनुसार, नर्स आणि फार्मसिस्ट एकाच रुग्णालयात काम करतात. याचदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना अनेक वचन दिले. आरोपी फार्मसिस्टने त्याच्या प्रेयसीला लग्नाचं वचन दिलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध केले. पण काही दिवसानंतर नर्सने फार्मसिस्टला लग्नाबाबत विचारलं, तेव्हा त्याने तिला धोका दिला.
हे ही वाचा >> इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे घाणेरडे चॅट्स! अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल... प्रकरण थेट पोलिसात
पोलिसांनी सुरु केला संपूर्ण घटनेचा तपास
पीडित तरुणीने म्हटलंय की, दोघांमध्ये एक वर्षापूर्वी प्रेमसंबंध सुरु झाले होते. लग्नाचं वचन देऊन फार्मसिस्टने लैंगिक संबंध केले. पीडितेच्या आरोपावरून पोलिसांनी फार्मसिस्टच्या विरोधात रांचीच्या अरगोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु करण्यासाठी आरोपी फार्मसिस्टला ताब्यात घेतलं.
नर्सने रडत रडत सांगितली आपबीती
नर्सने म्हटलंय की, जेव्हा ती रुग्णालयात रुग्णांना तपासण्यासाठी जात होती. तेव्हा फार्मसिस्ट तिच्यासोबत गोड गोड बोलायचा. त्यामुळे फार्मसिस्टसोबत तिची जवळीक वाढली. पीडितेनं सांगितलं की, ज्याप्रकारे आरोपी फार्मसिस्ट तिला वचन द्यायचा, त्या गोष्टींचा मी कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे मी त्याचा लग्नाचं प्रपोजल स्वीकारलं. त्यानंतर हळूहळू आमच्यातील संबंध वाढले. मी त्याला यासाठी नकार दिला नाही, कारण मला वाटलं की, तो खरंच माझ्यासोबत लग्न करेल. पण हे माहित नव्हतं की तो माझ्यासोबत टाईमपास करेल आणि माझा वापर करेल. त्याला कठोर शिक्षा व्हावी, ही माझी मागणी आहे.
हे ही वाचा >> इंस्टाग्रामवर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे घाणेरडे चॅट्स! अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल... प्रकरण थेट पोलिसात
ADVERTISEMENT
