पुण्यात खळबळ! 12 जणांचा संशयास्पद मृत्यू, नेमकं कारण काय?

मुंबई तक

• 12:10 PM • 29 May 2026

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. विषारी गावठी दारू प्राशन केल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Pune Hooch Tragedy

Pune Hooch Tragedy

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुण्यात खळबळ!

point

12 जणांचा संशयास्पद मृत्यू

point

नेमकं कारण काय?

Pune Hooch Tragedy : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विषारी गावठी दारू प्राशन केल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या हडपसर परिसरातील काळेपडळ येथे पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात सहा जणांचा जीव गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. फुगेवाडी आणि हडपसरच्या काळेपडळ परिसरात स्पिरीट म्हणजेच केमिकलयुक्त दारूचा पुरवठा करणाऱ्या योगेश वानखेडे याच्यासह आठ जणांना पिंपरी-चिंचवड पोलीस आणि एक्साईज विभागाने अटक केली आहे.

हे वाचलं का?

गावठी दारुचा व्यवसाय संशयाच्या भोवऱ्यात

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वानखेडे हा बऱ्याच काळापासून केमिकल मिसळून गावठी दारू बनवण्याचे आणि विकण्याचे काम करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने फुगेवाडी आणि काळेपडळ परिसरात या दारूचा पुरवठा केला होता. यानंतर ही दारू पिणाऱ्या लोकांची प्रकृती खालावू लागली आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवैध गावठी दारूचा व्यवसाय पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

हे ही वाचा : सांगली : रुग्णालयाचं ड्रेनेज तुंबल्याने सफाई, पण भयंकर दृश्य दिसलं अन् सगळे हादरले

रेकॉर्डवरील आरोपी

धक्कादायक बाब म्हणजे योगेश वानखेडे हा आधीपासूनच एक्साईज विभागाच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. वर्ष 2023, 2024 आणि 2025 मध्येही त्याच्यावर केमिकलयुक्त दारू बनवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. असे असूनही त्याच्यावर कठोर कारवाई न झाल्यामुळे आता एक्साईज विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एक्साईज विभागाला या अवैध व्यवसायाची माहिती नव्हती का? स्थानिक पोलीस यापासून अनभिज्ञ होते का? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

हे ही वाचा : आई भोंदू बाबाच्या जाळ्यात, मुलानं थेट शेवटच केला; पोलिसांसह सगळेच चक्रावले

आरोपीने केले सरेंडर 

या प्रकरणी जर वेळेत कारवाई झाली असती, तर अनेक लोकांचे प्राण वाचवता आले असते, असे लोकांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उशिरा रात्री योगेश वानखेडे याने एक्साईज विभागासमोर सरेंडर केले. यानंतर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आठ गुन्हेगारांना पोलीस आणि एक्साईज विभागाने अटक केली आहे, अशी माहिती डीसीपी संदीप आतोले यांनी दिली आहे.