Maharashtra Weather Today : जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात थंडीची हुडहुडी होती. परंतु, फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत असल्याचं समोर आलं. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये उकाडा आणखी वाढला आणि काही ठिकाणी उष्णतेची लाटच पसरली. या आठवड्यात काही ठिकाणी नागरिकांना उन्हाचे चटके बसले आहेत. तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, पुणे, विदर्भासह काही जिल्ह्यात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामान व विभागाकडून वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
कोणत्या जिल्ह्यात सूर्य आग ओकणार?
काल मंगळवारी 11 मार्च 2025 ला पालघर,ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली होती. परंतु, आज यामध्ये बदल झाला आहे. कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आज कोरडं हवामान असणार आहे. याचसोबत धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये कोरडं हवामान असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Satish Bhosle: 'खोक्या'ला पकडण्यासाठी जाळ टाकलाय, पोलिसांचा 'हा' प्लॅन पाहिला का?
फेब्रुवारी महिना संपताच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याचं समोर आलं. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 41.2 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे हवामान विभागाने मोठा इशारा दिला होता. ज्या ठिकाणी अति उष्णता असेल, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.
हे ही वाचा >> Tushar Kharat : भाजप मंत्री जयकुमार गोरेंना बिनधास्त नडलेले पत्रकार तुषार खरात कोण?
ADVERTISEMENT
