Tushar Kharat : भाजप मंत्री जयकुमार गोरेंना बिनधास्त नडलेले पत्रकार तुषार खरात कोण?

मुंबई तक

Tushar Kharat Vs Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांनी 6 मार्चला स्वत: सभागृहात बोलताना सांगितलं की, 2017 साली जिल्हा न्यायालय साताऱ्यामध्ये दाखल प्रकरणाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप आणि अश्लाघ्य भाषा वापरली. यावेळी त्यांनी तुषार खरात यांचं नाव घेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता.

ADVERTISEMENT

तुषार खरात कोण आहेत?
तुषार खरात कोण आहेत?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जयकुमार गोरे यांचं प्रकरण बाहेर काढलं?

point

तुषार खरात यांनी कोणता गुन्हा केला?

point

अटक झालेल्या पत्रकार तुषार खरात यांची A टू Z स्टोरी

Tushar Kharat Case : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होतोय. जयकुमार गोरे या प्रकरणामुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. संजय राऊत यांनी नाव घेऊन, तसंच विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ज्या महिलेला त्रास दिल्याचा आरोप आहे, ती महिला स्वत: माध्यमांसमोर आली. मात्र, हे संपूर्ण प्रकरण आणि जयकुमार गोरेंशी संबंधीत इतर वेगवेगळ्या प्रकरणांच्या बातम्या करणारे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आता हे तुषार खरात नेमके कोण असा सवाल उपस्थित होतोय. (Who is Tushar Kharat)

कोण आहे तुषार खरात?

तुषार खरात हे ‘लय भारी’ नावाच्या युट्यूब चॅनलचे संपादक असून, गेली अनेक वर्ष ते पत्रकार म्हणून काम करत आहेत. वेगवेगळ्या वृ्त्तसमुहांसोबत काम करताना, त्यांनी शिक्षण क्षेत्रातील घोटाळे आणि भ्रष्टाचार, मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाच्या जमिनी बळकावण्याच्या घटना,  कोविड काळातील वैद्यकीय महाविद्यालयातील अनियमितता, महिलांवरील अन्याय, अशा घटनांचं वार्तांकण केलं होतं. यातली अनेक प्रकरणं चर्चेची ठरली होती.

हे ही वाचा >> Beed Crime: 'Walmik Karad ने एकदा नव्हे तर 6 वेळा...' धक्कादायक माहिती आली समोर, 'तो' जबाब जसाच्या तसा...

तुषार खरात हे माण-खटाव परिसरातील रहिवासी असून, एक चर्चेतले पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या ‘लय भारी’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील गैरप्रकार आणि सत्ताधाऱ्यांचे गैरउद्योग यावर नेहमीच भाष्य केलं आहे. पत्रकारितेमध्ये काम करत असातना, त्यांना अनेकदा धमक्या आणि दबाव आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अधिवेशनाच्या सुरूवातीलाच माध्यमांशी संवाद साधताना जयकुमार गोरे यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली होती. त्यावेळी तुषार खरात आणि जयकुमार गोरे यांच्यातली खडाजंगी चांगलीच रंगली होती. जयकुमार गोरे यांना प्रश्न विचारतानाचा हा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला होता. यावेळी कॅमेऱ्याच्या मागून प्रश्न विचारणारा पत्रकार म्हणजे तुषार खरात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp