Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवार दि : 6 जुलै रोजी पंढरपुरात विठुरायाच्या चरणी भक्त लीन झालेत. सकाळी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. पंढरपुरात भक्तांचा महापूर ओसंडून वहिला आहे. चंद्रपूरच्या तीरावर भक्तांची स्नानासाठी झुंबड उडालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल आणि रुक्मिणीची यांच्या हस्ते पूजा पार पडली. अशातच एका शेतकऱ्यालाही पूजेचा मान देण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Weather : हिंदमाता, सायन, अंधेरी सबवेत पाणी साचणार? मुंबईत 'या' भागात पाऊस घालणार धुमाकूळ
मुख्यमंत्र्यांनी विठुरायाचा केला अभिषेक
दोघांनीही विठुरायाचा आणि रुक्मिणीचा दुध दह्याने अभिषेक केला. तसेच अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची लेक दिवीजा फडणवीसनंही उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून एका शेतकऱ्यास मान मिळाला. कैलास दामू उगले असे शेतकऱ्यांचं नाव आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचा मान शेतकऱ्याला मिळाल्याने कैलास यांच्या पोटात आनंद मावेनासा झाला होता.
शेतकऱ्याला मिळाला पूजेचा मान
दरम्यान, शेतकरी कैलास उगले हे गेल्या काही वर्षांपासून पंढरीची वारी करतात. या पूजेचा मान मिळाल्याने कैलास उगले यांनी आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. "हा आनंद आम्हाला शब्दात मांडता येत नव्हते. याआधीपासून अनेक वर्षे मी वारी करातोय. आता एसटीचा पास मिळाला तर महिन्याला येईल", असं म्हणत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
हेही वाचा : Personal Finance: पोस्ट ऑफिसची उत्तम योजना फक्त व्याजातून कमवा 82,000 रूपये!
या आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी येत असतात. आपल्या विठ्ठलाकडे साखडं घालतात. चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा भरतो. 'ज्ञानबा तुकाराम, माऊली तुकाराम' या नामाच्या गजरात अख्ख पंढरपूर दुमदुमतं.
ADVERTISEMENT
