Bank Holidays in September 2023 : बँक कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’, फक्त 15 दिवसच काम

रोहिणी ठोंबरे

25 Aug 2023 (अपडेटेड: 25 Aug 2023, 12:30 PM)

पाहा. सप्टेंबर महिन्यात अनेक सण असतात. तसंच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह या महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल.

bank holidays 2023 september : bank will be closed 16 days of september

bank holidays 2023 september : bank will be closed 16 days of september

follow google news

Bank Holidays In September 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सप्टेंबर महिन्यातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही प्रादेशिक सुट्ट्यांसह बंद राहतील. माहितीसाठी राज्यानुसार या प्रादेशिक सुट्ट्या ठरतात. म्हणजेच या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सण आणि उत्सवांवर अवलंबून असतात. (16 Days Bank Holidays For Bank Employees in The Month Of September 2023)

हे वाचलं का?

त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी जरूर पाहा. सप्टेंबर महिन्यात अनेक सण असतात. तसंच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह या महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल.

Chandrayaan-3 : विक्रम लँडरवर ‘सोनेरी कोटिंग’ का लावलं जातं तुम्हाला माहितीये का?

सप्टेंबर महिन्यात 16 दिवस बँका राहाणार बंद!

एकदा उन्हाळा संपला की, भारतात सर्व सणांना सुरूवात होते. अशात सप्टेंबर महिन्यात महत्त्वाचे सण साजरे केले जातात आणि यावर्षी या महिन्यात बॅंकाना भरमसाठ सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची तर मज्जाच झाली आहे. कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद या सणांमुळे बॅंका बंद असतील. अशावेळी जर तुम्हाला बँकेसंबंधित कोणतं महत्त्वाचं काम करायचं असेल तर सुट्ट्यांची लिस्ट पाहूनच काम पूर्ण करण्याचं नियोजन करा. नाहीतर तुमची बँकेतील फेरी वाया जाईल. चला तर मग या सुट्ट्यांची लिस्ट जाणून घेऊयात.

    follow whatsapp