Bhiwandi : रिल बनवता बनवता खाडीत उडी मारून तरूणाने का दिला जीव?

Bhiwandi News : मिथिलेश गुप्ता, डोंबिवली : डोंबिवलीच्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर मित्रांसोबत रिल बनवत असताना एका तरूणाने थेट खाडीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. रोहित अशोक मोर्या असे या 25 वर्षीय तरूणाचे नाव आहे.

bhiwandi news young boy jumps off the mankoli bridge into the creek while making instagram reel

डोंबिवलीच्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर मित्रांसोबत रिल बनवत असताना एका तरूणाने थेट खाडीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. रोहित अशोक मोर्या असे या 25 वर्षीय तरूणाचे नाव आहे.

मिथिलेश गुप्ता

• 10:27 PM • 23 Feb 2024

follow google news

Bhiwandi News : डोंबिवलीच्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर (Mankoli Bridge) मित्रांसोबत रिल बनवत असताना एका तरूणाने थेट खाडीत उडी घेतल्याची घटना घडली आहे. रोहित अशोक मोर्या असे या 25 वर्षीय तरूणाचे नाव आहे. रोहितने खाडीत उडी घेतल्यानंतर त्यांच्या मित्राने बचावासाठी आरडाओरड केली होती. मात्र त्याच्यापर्यंत कुणालाच पोहोचता आले नाही आणि तो दिसेनासा झाला होता. या घटनेनंतर विष्णुनगर पोलिसांनी (vishnunagar Police) अग्निशमन दलाला माहिती देतात खाडी किनारी शोध मोहिम राबवण्यात आली. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही आहे. (bhiwandi news young boy jumps off the mankoli bridge into the creek while making instagram reel)  

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित अशोक मोरया असे खाडीत उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित हा भिवंडीतील साईनगर परिसरात राहत होता.  शुक्रवारी दुपारी आपल्या एका मित्रासोबत रोहित खाडीच्या पुलावर इन्स्टाग्रामची रिल बनवण्यासाठी आला होता. मोठगावजवळील माणकोली पुलावर मित्रांसोबत रिल बनवत असता त्याने अचानक खाडीत उडी मारली होती. रोहितने अचानक उडी घेतल्याने त्याच्या मित्राका काही काळ काहीच समजले नाही. त्यानंतर त्याने काही वेळानंतर मित्राच्या बचावासाठी आरडाओरड केली. मात्र रोहित खाडीत बुडेपर्यंत कुणीही बचावासाठी आले नव्हते. 

हे ही वाचा : पवारांचा एक फोन अन् बाळासाहेबांनी.. 'पंत' असे बनलेले CM

रोहितच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले की, व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर रोहितने अचानक पुलावरून खालच्या खाडीत उडी मारली होती. रोहित बरोबर कोणाचाही वाद नव्हता किंवा तो तणावाखालीही नव्हता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते. तसेच अग्निशमन दलाने खाडी परिसरात तरुणाचा शोध सुरू केला होता. या प्रकरणी मित्रांकडे चौकशी केल्यानंतर विष्णुनगर पोलीसांनी रोहितने आत्महत्या केली होती की हा अपघात आहे. या दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा तपास सूरू केला आहे. 

    follow whatsapp