Central Railway : मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या 84 लोकल रद्द

प्रशांत गोमाणे

10 Feb 2024 (अपडेटेड: 10 Feb 2024, 08:18 PM)

Central Railway : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील तब्बल 84 लोकल रद्द करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहेत.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील तब्बल  84 लोकल रद्द करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहेत.

mumbai local central railway 84 local cancelled inconvenience in railway passenger

follow google news

Central Railway 84 local Train Cancelled :  मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील तब्बल 84 लोकल रद्द करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहेत.एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.अनेक प्लँटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. या ट्रेन रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत अनेक लोकल रद्द होण्याची शक्यता आहे.(mumbai local central railway 84 local cancelled inconvenience in railway passenger)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी एका मोटरमनने आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या घटनेनंतर अनेक सहकारी मोटरमन त्यांच्या अंतिम संस्कारासाठी गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या 84 लोकल रद्द करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या ट्रेन रद्द झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आणि लोकल प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

हे ही वाचा : बलात्कार, मॉरिस अन् दाऊद.. हादरवून टाकणारी Inside Story

मुरलीधर शर्मा नावाच्या मोटरमनचा मृत्यू झाला आहे. या मोटरमनकडून लोकल चालवत असताना रेल्वेचा रेड सिग्नल क्राँस केला होता. ज्यामुळे त्यांच्यावर रेल्वेकडून कारवाई होणार होती. या कारवाईच्यी भितीपोटी या मोटरमनने सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद स्टेशनच्यामध्ये लोकलमधून उडी घेत आत्महत्या केली होती, असा रेल्वे युनियनचा दावा आहे. 

त्यामुळे याच मोटरमनच्या अंतिम संस्कारासाठी इतर सहकारी मोटरमन गेले होते. त्यामुळे 84 लोकल रद्द झाल्या आहेत. या लोकल रद्द झाल्यामुळे मध्य रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरू आहे. प्लँटफॉर्मवर लोकल ट्रेनही उशिराने दाखल होत आहेत, त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. 

हे ही वाचा : रवींद्र जडेजा वडिलांच्या मुलाखतीनंतर संतापला

 

    follow whatsapp