'माझ्या पत्नीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न', वडिलांच्या मुलाखतीनंतर जडेजाचं टोकाचं पाऊल
रवींद्र जडेच्या वडिलांनी दिलेल्या मुलाखतीनंतर त्यांनी केलेल्या आरोपानंतर जडेजानं आपल्या पत्नीची बाजू घेत वडिलांनाच त्याने सुनावले आहे. मला काही आता बोलायला लावू नका अशा भाषेत त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रवींद्र जडेजा आणि वडिलांचा वाद चिघळला

पत्नीवरून जडेजा आणि वडिलांमध्ये दरी

पत्नीमुळे जडेजाने वडिलाने सुनावलं
Ravindra Jadeja Reaction on Father Anirudhsinh Jadeja:टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतग्रस्त असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. वयाची पस्तीशी पूर्ण करणाऱ्या जडेजाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानंतर तो शुक्रवारी अचानक चर्चेत आला आहे, तो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. जडेजाच्या वडिलांनी आपला मुलगा रवींद्र आणि सून रिवाबा (Rivaba Jadeja) यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी अगदी जाहिरपणे सांगितले आहे.
प्रतिमा मलीन
रवींद्र जडेजाच्या वडिलांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर रवींद्र जडेजानेही वडिलांच्या मुलाखतीनंतर त्यांना उत्तर दिलं आहे. वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीना त्याने नाकारल्या आहेत. तर दुसरीकडे त्या मुलाखतीतून पत्नी रिवाबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्याने म्हटले आहे.
स्क्रिप्टेड मुलाखत
जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट करून वडिलांच्या मुलाखतीतील सगळेच मुद्दे नाकारले आहेत. वडिलांच्या त्या स्क्रिप्टेड मुलाखतीत ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करा असंही त्याने म्हटले आहे.
मुलाखतीत एकच बाजू
रवींद्र जडेजाने गुजरातीमध्ये वडिलांच्या मुलाखतीविषयी लिहिले आहे की, 'दिव्य भास्करमध्ये आलेल्या मुलाखतीत जे काही सांगितले आहे ते चुकीचे आहे. त्या मुलाखतीत कोणताही अर्थ नाही. त्या मुलाखतीत फक्त एका बाजूचा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा मी निषेध करतो असंही त्याने म्हटले आहे.