ED searches in pune : हसन मुश्रीफांच्या कार्यालयांची ईडीकडून झाडाझडती

दिव्येश सिंह

03 Apr 2023 (अपडेटेड: 03 Apr 2023, 10:45 AM)

माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील कार्यालयांवर ईडीने सोमवारी (3 एप्रिल) पुन्हा (enforcement directorate) छापे टाकले.

Hasan Mushrif money laundering case, ED searches at some locations in Pune

Hasan Mushrif money laundering case, ED searches at some locations in Pune

follow google news

NCP leader Hasan Mushrif money laundering case : माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील कार्यालयांवर ईडीने सोमवारी (3 एप्रिल) पुन्हा (enforcement directorate) छापे टाकले. मुश्रीफांच्या पुण्यातील काही कार्यालयांची झाडाझडती सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर ईडीने मुश्रीफ यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केलेला असून, गेल्या काही महिन्यापासून या प्रकरणी ईडीकडून छापेमारी आणि मुश्रीफांची चौकशी सुरू आहे. (ED searches at some locations in Pune since morning in connection with money laundering case against former cabinet Minister and NCP leader Hasan Mushrif)

हे वाचलं का?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना आणि सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात गुंतवलेल्या पैशांबद्दल किरीट सोमय्यांनी हे आरोप केलेले आहे.

हेही वाचा – किरीट सोमय्यांना दणका, हसन मुश्रीफांना दिलासा! उच्च न्यायालयात काय घडलं?

याच प्रकरणात ईडीकडून तपास सुरू आहे. मनी लाँडरिंग प्रकरणातच हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील काही कार्यालयात ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी सकाळी गेले. या कार्यालयांची झाडाझडती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

ईडीकडून हसन मुश्रीफांची चौकशी, पीएमएलए कोर्ट काय देणार निकाल?

हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी झाडाझडती घेतल्यानंतर ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. मुश्रीफ यांची ईडीच्या मुंबईतील कार्यालयात या प्रकरणात दोन वेळा चौकशीही झालेली आहे. सध्या त्यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेले असून, आता हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पीएमएलए कोर्टाचा निकाल 5 एप्रिल रोजी दिला जाणार आहे. त्या आधीच ही झाडाझडती घेण्यात आली.

हसन मुश्रीफ मनी लाँडरिंग केस : किरीट सोमय्यांचे आरोप काय?

मुंबईतील भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानुसार, अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं ताब्यात घेतला होता आणि या कंपनीचे मालक मुश्रीफांचे नातेवाईक मतीन हसीन मंगोली हे होते.

हेही वाचा – मुश्रीफांविरुद्ध कारवाई, यशवंत जाधवांना दिलासा?; 2 केसमध्ये साम्य काय?

ब्रिक्स इंडियाला कारखाना देताना प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही. त्याचबरोबर हसन मुश्रीफ हे सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाने 127 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहार आणि मनी लाँडरिंगमध्ये सामील आहेत, असे आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेले आहेत.

    follow whatsapp