रेल्वेभरतीसह इतर 9 सरकारी विभागांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आली समोर 

रेल्वेभरतीसह इतर सरकारी 9 विभागांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आली समोर, सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी 9970 जागा रिक्त,  बिहारमध्ये पारिचारिका या पदासाठी 11389 रिक्त जागा, राजस्थान पोलीस भरतीसाठी 9000 रिक्त जागा 

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई तक

• 04:50 PM • 04 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रेल्वेभरतीसह इतर सरकारी 9 विभागांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

point

सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी 9970 जागा रिक्त 

point

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आली समोर 

point

पोलीस भरतीसाठी 9000 रिक्त जागा

Government Job Opportunity : मे महिन्याच्या सुरूवातीलाच रेल्वे विभागासोबतच इतर सरकारी विभागात काम करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे.  रेल्वेसोबतच पोलीस, आर्मी, शिक्षिक आणि इतर अन्य खात्यातील पदांसाठी भरती सुरू आहे. सरकारी नोकरीचा लाभ घेणाऱ्या  तरूणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. संबंधित पदांसाठी भरती सुरू करण्यात आली असून या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख समोर आली आहे. 

हे वाचलं का?

सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी 9970 जागा रिक्त 

रेल्वे भरतीच्या सहाय्यक लोको पायलटसाठी 9970 पदांच्या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. ज्यात इयत्ता १० वी, आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या आता मान्यता प्राप्त विद्यार्थ्यी संबंधित नोकरीसाठी अर्ज दाखल करू शकतात. रेल्वे भरतीच्या नोकरीसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही १३ मे आहे. तर अर्ज दाखल करण्यासाठी www.rrbapply.gov.in या वेबसाईटला जाऊन आपला अर्ज भरू शकता.  

पारिचारिका पदासाठी  सुवर्णसंधी 

त्याच प्रमाणे बिहारमध्ये पारिचारिका या पदासाठी 11389 रिक्त जागा आहेत. ज्यांना या क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी आहे अशांनी या संधीचे सोने करावे. यासाठी बिहारमधील संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी btsc.bihar.gov.in भेट देऊन आपला अर्ज दाखल करावा. अर्जाची अंतिम तारीख ही 23 मे 2025 आहे. 

राजस्थानात पोलीस भरतीसाठी 9000 रिक्त जागा

अशातच आता बिहारनंतर राजस्थान पोलीस भरतीसाठी 9000 रिक्त जागा आहेत. ज्या उमेदवारांना पोलीस दलात दाखल होऊन करिअर करायचं आहे. त्यांना ही सुवर्णसंधी आहे. अर्ज दाखल करण्यासाठी राजस्थान एसएसओ पोर्टलवर जाऊन अर्ज दाखल करावा. तर या पदासाठी आपण ऑनलाईनही अर्ज दाखल करू शकता.  ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 17 मे 2025 असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा >> Maharashtra Board HSC Result 2025: 12 वीच्या निकालाची तारीख लवकरच, रोल नंबर 'असा' करा डाऊनलोड

आरोग्य विभागात 4500 रिक्त जाग

बिहारच्या आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी पदांसाठी 4500 रिक्त जागा आहेत. या पदाच्या अर्जासाठी 5 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर अंतिम तारीख ही  26 मे  2025 पर्यंत अर्ज दाखल करू शकता. यासाठी shs.bihar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

भारतीय सैन्यदलात  नोकरीची सुवर्णसंधी

पोलीस भरती, पारिचारिका भरतीनंतर आता भारतीय सैन्यदलात भरतीची युवकांना सुवर्णसंधी आहे. यासाठी तंत्रज्ञान पदवी अंतर्गत पदवी असावी असे सांगण्यात आले. अर्जदाराचे वय वर्षे 20 ते  27 असावे आणि अर्ज दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क भरता येणार नाही. 

'या' बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी 

अशातच यूनियन बँक ऑफ इंडियाच्या असिस्टंट मॅनेजर पदासाठी 500 रिक्त जागा आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत ibpsonline.ibps.in  या संकेतस्थळाला भेट द्या.  अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 20 मे 2025 असणार आहे.

हेही वाचा >>  Railway Recruitment: रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी मोठी भरती; Apply करण्याची 'ही' शेवटची तारीख, पगार तब्बल...

पथनिर्माण विभागासोबत या विभागांत नोकरीची संधी 

बिहारमधील पथनिर्माण विभाग, बांधकाम विभाग, जल संसाधन विभाग, ग्रामीण विभागासोबत इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीची संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 मे 2025 असणार आहे. यासाठी संबंधितांनी अर्ज दाखल करण्यासाठी www.bpsc.bih.nic.in या संकेतस्थळाला  भेट द्यावी. 

शौक्षणिक क्षेत्रात नोकरीची संधी

अशातच इलाहाबाद विद्यापिठात असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आणि असोसिएट पदासाठी 35 हून अधिक अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी अर्जदाराचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर झालेलं असावे, अशी अट आहे. 

सहाय्यक अधीक्षकांसह इतर अधिकारी स्तरावरील पदांसाठी अर्ज

दरम्यान, एकूण 10 विभागांपैकी अंतिम विभाग हा अकाउंटंट, सहाय्यक अधीक्षकांसह इतर अधिकारी स्तरावरील पदांसाठी अर्ज सुरू करण्यात आले आहेत. यासाठी संबंधित अर्जदाराचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले असावे. 

    follow whatsapp