Railway Recruitment: रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी मोठी भरती; Apply करण्याची 'ही' शेवटची तारीख, पगार तब्बल...
साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे (SESR), आरआरसी नागपुर विभागाने अप्रेंटिसच्या मोठ्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. यासाठी पात्र उमेदवार अधिकृत साइटवर जाऊन यासंबंधिची माहिती तपासू शकतात. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रेल्वेमधील 'या' पदांसाठी मोठी भरती

रेल्वेमध्ये करिअरचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट

साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे (SESR) अप्रेंटिस भरती
Railway Vacancy: रेल्वे भरतीच्या परीक्षांचा अभ्यास करण्याऱ्या तरुणांसाठी सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या मुलांना रेल्वे मध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकते. साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे (SESR), आरआरसी नागपुर विभागाने अप्रेंटिसच्या मोठ्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. यासाठी पात्र उमेदवार अधिकृत साइटवर जाऊन यासंबंधिची माहिती तपासू शकतात.
भरतीसाठी इच्छुक करणाऱ्या उमेदवारांना apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करावं लागणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थी 4 मे 2025 तारखेपर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अप्लाय करू शकतात. त्यामुळे याकडे पात्र परीक्षार्थींनी लवकरच साइटवर जाऊन अप्लाय करणं गरजेचं आहे. अंतिम तारीख निघून गेल्यानंतर उमेदवारांना अप्लाय करण्याची संधी मिळणार नाही.
'या' पदासाठी रिक्त जागा
या भरतीअंतर्गत, SECR ने एकूण 1007 पदांसाठी अप्रेंटिस भरतीची घोषणा केली आहे. यापैकी 919 पदे नागपूर विभागासाठी राखीव आहेत आणि 88 पदे वर्कशॉप मोतीबागसाठी राखीव आहेत.
हे ही वाचा: CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर, कोणत्या मंत्र्यांनी मारलीय बाजी, कोण ठरलंय सरस?