CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर, कोणत्या मंत्र्यांनी मारलीय बाजी, कोण ठरलंय सरस?
CM फडणवीसांनी 100 दिवसांचा निकालाच केला जाहीर केला आहे. ज्यात महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये 5 मंत्रालयीन विभागाचे सचिव, 5 मंत्रालयीन विभागाचे आयुक्त, 5 जिल्हाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. जाणून घ्या कुणाची कामगिरी दमदार...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा १०० दिवसांचा निकाल
सर्वोत्तम जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे
सर्वोत्तम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये ठाणे अव्वल
सर्वोत्तम विभागीय आयुक्तांमध्ये कोकण अव्वलस्थानी
Maharashtra News: राज्यातील फडणवीस सरकारमध्ये कोणाचं काम कसं आहे याचा 100 दिवसांचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल आहे. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. यात वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारणा, सुलभ जीवनमान, गुंतवणूक चालना तसेच तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणारी मंत्रालयं, अधिकारी यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये 5 मंत्रालयीन विभागाचे सचिव, 5 मंत्रालयीन विभागाचे आयुक्त, 5 जिल्हाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे 5 पोलीस अधीक्षक, 5 जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, 4 महापालिका आयुक्त, 3 पोलीस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलीस परिक्षेत्रे महानिरिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या पथकाने प्रभावी आणि कल्पकतेने अंमलबाजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या हातून भविष्यात चांगले कार्य घडावे असे ट्विट करत त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
हे ही वाचा >> अजित पवार निधी वाटणार, पण 'या' मंत्र्यांची सुद्धा नजर असणार, फडणवीसांची रणनीती काय?










