ATM पासून ते रेल्वेच्या तिकीटांपर्यंत... आजपासून बदलणार या'
मे महिन्याच्या सुरूवातीलाच देशातील योजनांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. एटीएम मधून पैसे काढण्यापासून ते रेल्वेचं तिकीट बुक करण्यापर्यंत, बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

1 मे पासून देशातील योजनांच्या नियमांमध्ये बदल

कोणत्या योजनांमध्ये बदल करण्यात आले आहेत?

1 मे पासून कोणत्या नियमांमध्ये बदल झाले?
Country Rules change: आज 1 मे पासून, देशात बरेच मोठे बदल लागू करण्यात आले आहेत. या सगळ्या बदलांचा सामान्य माणसाच्या खिशावर आणि त्याच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होणार असल्याचं पाहायला मिळतंय. एटीएम मधून पैसे काढण्यापासून ते रेल्वेचं तिकीट बुक करण्यापर्यंत, बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
एटीएम मधून पैसे काढणं महागलं
1 मे 2025 पासून एटीएम मधून पैसे काढणं महाग झालं आहे. भारतीय रिजर्व्ह बॅंक (RBI) ने एटीएमचे चार्ज वाढण्याची परवानगी दिली आहे. जर तुम्ही तुमच्या बॅंकेच्या एटीएम ऐवजी कोणत्या दुसऱ्या बॅंकेच्या एटीएम मधून पैसे काढत असाल, तर तुम्हाला प्रत्येक ट्रांझॅक्शनच्या मागे 17 रुपयांऐवजी 19 रुपये द्यावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त, दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून बॅलेन्स चेक केल्यानंतर 6 रुपये शुल्काऐवजी आता 7 रुपये आकारण्यात येणार आहेत. बऱ्याच बँकांनी आपल्या वेबसाइटवर मोफत ट्रांझेक्शन सुविधेच्या सीमेवर लागणाऱ्या शुल्कासंबंधिची सुद्धा माहिती दिली आहे. काही बँकेमध्ये हे शुल्क 23 रुपयांपर्यंत आहे.
रेल्वे तिकीट बुकींच्या नियमांमधील बदल
भारतीय रेल्वेने 1 मे पासून तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता फक्त जनरल कोचमध्येच वेटिंग तिकीट मान्य होणार आहे. याचा अर्थ, तुम्ही वेटिंग लिस्टमधील तिकीटाच्या आधारे स्लीपर कोचमधून प्रवास करू शकणार नाही. यासोबतच, 120 दिवसांचा अॅडवान्स्ड रिझर्वेशनचा कालावधी आता फक्त 60 दिवसच करण्यात आला आहे.
मे महिन्यात 12 दिवस बँक बंद
मे महिन्यात जर बॅंकेशी संबंधित तुमचं काम असेल तर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी तुम्ही तपासायला हवी. मे महिन्यातील वेगवेगळ्या राज्यांमधील सण आणि खास औचित्य असल्याकारणाने 12 दिवस बँका बंद राहणार आहेत.
एफडीच्या व्याज दरामध्ये कपात
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नुकतंच पॉलिसीच्या दरांमध्ये कपात केली आहे. यानंतर बऱ्याच बॅंकांनी फिक्स्ड डिपॉजिट (FD) च्या व्याज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 1 मे पासून लागू होऊ शकते. यामुळे एफडीवर मिळणारे रिटर्न्स कमी होऊ शकतात.
हे ही वाचा: महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये लपलेली ही ठिकाणं तुम्ही फिरलात का? वाचा यादी...
11 राज्यांमध्ये RBI योजना
1 मे 2025 पासून 11 राज्यांमध्ये 'वन स्टेट- वन आरबीआय' योजना लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक राज्याच्या सर्व क्षेत्रातील ग्रामीण बॅंकांना मिळून एक मोठी बॅंक बनवण्यात येणार आहे. यामुळे बॅंकेच्या सुविधांमध्ये सुधार होण्याची आणि ग्राहकांनी उत्तम सुविधा मिळणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात हे बदल लागू होऊ शकतात.