मुंबई-पुणे प्रवास आता जलद गतीने होणार, हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर संदर्भात निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा
Railway budget 2026 : अर्थमंत्री सीतारामन यांनी हे हायस्पीड रेल्वे मार्गांना ‘ग्रोथ कनेक्टर्स’ असल्याचे सांगितले आहे. हे मार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणारे नसून, आर्थिक विकासाला चालना देणारे ठरणार आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारे हे रेल्वे कॉरिडोर कमी कार्बन उत्सर्जनासह दीर्घ पल्ल्याचा प्रवास अधिक सोयीस्कर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई-पुणे प्रवास आता जलद गतीने होणार
हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर संदर्भात निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा
Railway budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेणारी घोषणा केली आहे. देशभरात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर उभारण्यात येणार असून, यामुळे मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, वाराणसी आणि सिलीगुडीसारखी प्रमुख शहरे वेगवान रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. या निर्णयामुळे देशातील दळणवळण अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांनी हे हायस्पीड रेल्वे मार्गांना ‘ग्रोथ कनेक्टर्स’ असल्याचे सांगितले आहे. हे मार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणारे नसून, आर्थिक विकासाला चालना देणारे ठरणार आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारे हे रेल्वे कॉरिडोर कमी कार्बन उत्सर्जनासह दीर्घ पल्ल्याचा प्रवास अधिक सोयीस्कर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : अल्पवयीन तरुणांचा 6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार... आरोपीच्या आईने स्वतःच्या मुलासोबत पाहा केलं तरी काय
हे आहेत प्रस्तावित 7 हायस्पीड रेल्वे कॉरीडॉर
1. मुंबई–पुणे : महाराष्ट्रातील दोन प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक शहरांमधील प्रवास जलद गतीने होणार आहे.
2. पुणे–हैदराबाद : महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे.
3. हैदराबाद–चेन्नई : दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमधील संपर्क अधिक मजबूत करेल.
4. हैदराबाद–बेंगलोर : आयटी क्षेत्रातील दोन मोठ्या केंद्रांमधील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
5. चेन्नई–बेंगलोर : तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील हायस्पीड रेल्वे संपर्क वाढवणारा मार्ग.
6. दिल्ली–वाराणसी : राजधानी दिल्लीला उत्तर प्रदेशातील धार्मिक शहर म्हणून ओळख असलेल्या वाराणसीशी जोडणारा हा कॉरीडॉर पर्यटन आणि व्यापाराला चालना देईल.
7. वाराणसी–सिलीगुडी : पूर्व भारतासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग पश्चिम बंगाल आणि ईशान्य राज्यांशी संपर्क अधिक मजबूत करणार आहे.










