'2047 पर्यंत भारत बनणार ग्लोबल लीडर...' निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे
Union Budget 2026 : निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठी अपडेट दिली. सीतारामन म्हणाल्या की, 'आपण लवकरच सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत.' यासोबतच त्यांनी सांगितले की, 'आमच्या सरकारच्या काळात भारतातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. 2047 पर्यंत आपण 'ग्लोबल लीडर' बनू असंही त्या म्हणाल्या.'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
2047 पर्यंत भारत बनणार ग्लोबल लीडर
निर्मला सीतारामन यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0 या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा नववा अर्थसंकल्प आहे. त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठी अपडेट दिली. सीतारामन म्हणाल्या की, 'आपण लवकरच सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत.' यासोबतच त्यांनी सांगितले की, 'आमच्या सरकारच्या काळात भारतातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. 2047 पर्यंत आपण 'ग्लोबल लीडर' बनू असंही त्या म्हणाल्या.'
आपल्या भाषणाची सुरुवात करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'आमचं लक्ष गरीब आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर राहिलं आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मितीच्या दिशेने काम करण्याबाबतचे निर्णय आम्ही घेत आहोत. यामुळे आर्थिक विकासाला पाठबळ मिळत आहे. याचा परिणाम भारताच्या जीडीपीवरही दिसून आला आणि तो 7 टक्क्यांच्या वर राहिला. आम्ही निर्यात वाढवण्याचे काम केले आहे आणि जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच वाढवली आहे.'
सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे :
- हा युवा शक्ती अर्थसंकल्प आहे. यामध्ये शेतकरी, गरीब आणि सामान्य माणसाची काळजी घेण्यात आली आहे.
- महसूली तूट कमी करण्यावर सरकारचा भर राहिला आहे.










