15 August News : चार दिवसांपूर्वीच झाले तहसिलदार, तिरंगा यात्रेतच मृत्यू गाठलं!

रोहिणी ठोंबरे

• 01:09 PM • 14 Aug 2023

सतना जिल्ह्यातील बिरसिंगपूर येथे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान ऑन ड्यूटी असलेले बिरसिंहपूरचे प्रभारी तहसीलदार के.के.पटेल यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून सतना येथे पाठवण्यात आले असता तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

Mumbaitak
follow google news

MP : Satna News : सतना जिल्ह्यातील बिरसिंगपूर येथे काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान ऑन ड्यूटी असलेले बिरसिंहपूरचे प्रभारी तहसीलदार के.के.पटेल यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून सतना येथे पाठवण्यात आले असता तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. केके पटेल यांची बिरसिंगपूरचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही घटना समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. (K.K. Patel who became Tehsildar four days ago died of a heart attack during on duty in Tiranga Yatra)

हे वाचलं का?

के.के. पटेल यांची प्रकृती अचानक कशी खालावली?

नगर पंचायत बिरसिंगपूर येथे आयोजित तिरंगा यात्रा कार्यक्रमात सहभागी होत के.के. पटेल ऑन ड्यूटी होते. बाहेर खूप ऊन असल्यामुळे नगर पंचायत कार्यालयाजवळील दुकानात ते बसले. काही वेळाने त्यांचे हात पाय थंड पडायला लागले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बिरसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. जिथे डॉ.देवेश मिश्रा यांनी पाहिले आणि सतना येथे नेण्यास सांगितले.

Sharad Pawar Meet Ajit Pawar: ‘सामना’चा अग्रलेख शरद पवारांच्या जिव्हारी, पत्रकारावर संतापले!

माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल

के.के. पटेल यांना त्यांच्याच कारमधून बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केले. पटेल यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अनुराग वर्मा, एडीएम ऋषी पवार, महापालिका आयुक्त अभिषेक गेहलोत, एसडीएम आणि इतर अधिकारी बिर्ला रुग्णालयात पोहोचले.

Sharad Pawar Ajit Pawar meet : ‘तुम्ही माझं ऐकत नाही’, ‘त्या’ भेटीनंतर राज ठाकरेंचं मोठं भाकित

चार दिवसांपूर्वीच स्वीकारला पदभार!

प्रशासकीय व्यवस्थेअंतर्गत, या वर्षी 4 एप्रिल रोजी, 55 वर्षीय के.के. पटेल यांना भूमी अभिलेख विभागाचे प्रभारी सहायक अधीक्षक म्हणून थेट सतना येथे पाठवण्यात आले. 8 ऑगस्ट रोजी त्यांना बिरसिंगपूरच्या तहसीलदाराची जबाबदारी मिळाली आणि 9 ऑगस्ट रोजी ते रुजू झाले. पटेल 1993 मध्ये पटवारी पदावरून सरकारी सेवेत रुजू झाले, त्यानंतर ते महसूल निरीक्षक झाले आणि ASLR मध्ये त्यांची पदोन्नती झाली.

    follow whatsapp