Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना काय मेल पाठवला?

मुंबई तक

• 08:10 PM • 05 Mar 2024

Rahul Narwekar Email Hack :अज्ञात इसमाने नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक करून राज्यपालांना ईमेल पाठवल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

maharashtra assembly speaker rahul narvekar email id hacked email sent to governor ramesh bais

अज्ञात इसमाने नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक करून राज्यपालांना ईमेल पाठवल्याची माहिती आहे.

follow google news

Rahul Narwekar Email Hack : सौरभ वक्तानिया, मुंबई :  महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ई मेल आयडी हॅक झाल्याची घटना घडली आहे.  अज्ञात इसमाने नार्वेकरांचा ईमेल आयडी हॅक करून राज्यपालांना ईमेल पाठवल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मरिन ड्राईव्ह (Marine Drive) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.  (maharashtra assembly speaker rahul narvekar email id hacked email sent to governor ramesh bais) 

हे वाचलं का?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा आज ईमेल आयडी हॅक झाल्याची घटना घडली होती. अज्ञात इसमाने राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक करून राज्यपाल रमेश बैस यांना पाठवल्याची माहिती आहे. सभागृहामध्ये आमदार नीट वागत नसल्याचा या मेलमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. राजभवनच्या अधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला होता. 

हे ही वाचा : Amit Shah : शाहांनी शरद पवारांनाच मागितला हिशोब

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर यांच्या अधिकृत ईमेल आयडीवरून राजभवनाच्या अधिकृत ईमेलवर ईमेल प्राप्त झाला होता. या ईमेलमध्ये काही आमदार विधानसभेत नीट वागत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. या ईमेलनंतर राजभवनच्या अधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता ही घटना उघडकीस आली. 

नार्वेकर काय म्हणाले? 

माझ्या नावाने ई मेल आयडीने राज्यपाल महोदयांकडे कुठच्यातरी संदर्भातलं पत्र पाठवण्यात आले आहे. या संदर्भातली तक्रार मी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात केली आहे. आणि सायबर सेल या संदर्भातली संपूर्ण माहिती घेईल. मी अजून तरी नेमका काय मेल पाठवला आहे, तो वाचला नाही आहे. पण कार्यालयात जाऊन या संदर्भातली माहिती घेईन, असे राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Amruta Fadnavis सापडल्या अडचणीत ठाकरे धावले मदतीला!

 प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 419, 170 आणि 66 सी, 66 डी नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे. 

    follow whatsapp