Amit Shah : शाहांनी शरद पवारांनाच मागितला हिशोब, पहिल्याच सभेत काय बोलले?
Amit Shah direct challenge Sharad pawar :महाराष्ट्रात तीन पायांची रिक्षा चालते.तिचे नाव महाविकास आघाडी आहे. या रिक्षाचे तीनही चाकं पंक्चर आहेत. महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास देऊ शकते का? असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT
Amit Shah direct challenge Sharad pawar : ''महाराष्ट्राची जनता तुम्हाला 50 वर्षांपासून सहन करते आहे. त्यामुळे 50 वर्ष सोडा 5 वर्षांचा जनतेला हिशोब द्या'', असे थेट आव्हानच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांना दिले आहे. अमित शाह यांनी यावेळी घटक पक्षांवर देखील जोरदार हल्ला चढवला होता. (amit shah direct challenge sharad pawar jalgaun rally narendra modi maharashtra politics)
ADVERTISEMENT
जळगावमधील सागर पार्क मैदानात युवकांशी संवाद साधताना अमित शाह बोलत होते. यावेळी बोलताना अमित शाह यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांवर टीका केली. सोनिया गांधीला राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचय, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचंय, ममता बॅनर्जीला भाच्याला मुख्यमंत्री बनवायचंय, स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे. यामध्ये तुमच्यासाठी काहीच नाही, तुमच्यासाठी नरेंद्र मोदी आहेत, असा जोरदार हल्लाबोल अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर केला.
हे ही वाचा : Amruta Fadnavis सापडल्या अडचणीत ठाकरे धावले मदतीला!
शरद पवारांवर शाहांची टीका
शरद पवारांवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, पवार साहेब मोदींना 10 वर्ष झाली आहेत. आणि तुम्हाला महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षापासून सहन करते. पण तुम्ही 50 वर्ष सोडा, जनतेला 5 वर्षांचा हिशोब द्या. मी तर 10 वर्षांचा हिशोब द्यायला आलो आहे, असे अमित शाह सांगत पवारांना आव्हान दिले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 10 वर्षाचा हिशोब पण आहे आणि 25 वर्षाचं ह्विजन देखील आहे. असा नेता देशाला परत परत मिळत नसतो, असे अमित शाह यांनी यावेळी म्हटले.
हे वाचलं का?
महाविकास आघाडीची उडवली खिल्ली
महाराष्ट्रात तीन पायांची रिक्षा चालते.तिचे नाव महाविकास आघाडी आहे. या रिक्षाचे तीनही चाकं पंक्चर आहेत. महाराष्ट्रात पंक्चर झालेली रिक्षा विकास देऊ शकते का? असा सवाल अमित शाह यांनी उपस्थित करत, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच महाराष्ट्राला विकास देऊ शकते, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : 'सरकारकडे काही मागू नका, आता सरकार कोणतं...' शेतकरी आंदोलनावरून नाना पाटेकर संतापले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT