Amruta फडणवीस सापडल्या अडचणीत ठाकरे धावले मदतीला, स्वत:च्या विमानात...

ऋत्विक भालेकर

Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस जामनगरला जाताना काहीशा अडचणीत सापडल्या त्याचवेळी ठाकरे कुटुंबीयांनी त्यांना एक मोठी मदत केली. ज्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

अमृता फडणवीसांना ठाकरेंची मदत
अमृता फडणवीसांना ठाकरेंची मदत
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमृता फडणवीसांना ठाकरेंनी केली मदत

point

स्वत:च्या खासगी विमानात ठाकरेंकडून अमृता फडणवीसांना जागा

point

अमृता फडणवीस आणि ठाकरेंमध्ये संवादही

Uddhav Thackeray and family fly together with Amruta Fadnavis: मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक अशी ओळख असलेले मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा दोनच दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा पार पडला. जो कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे. पण याशिवाय एक अशी घडामोड घडली आहे की, ज्याची महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक चर्चा आहे. (uddhav thackeray and family fly together with amruta fadnavis for anant ambanis pre wedding)

त्याचं झालं असं की, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी चक्क उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत चार्टर्ड विमानाने गुजरातच्या जामनगरपर्यंत प्रवास केला. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अमृता फडणवीसांना नेमका का करावा लागला ठाकरे कुटुंबासोबत प्रवास? 

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी-राधिक मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुबांनी हजेरी लावली. यासोबतच देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील मुलगी दिविजासोबत जामनगरला गेल्या होत्या.

गुजरातच्या जामनगरमध्ये अत्यंत शानदार सोहळा पार पडला. याच सोहळ्यासाठी ठाकरेंसोबत अमृता फडणवीस यांनी मुंबई ते जामनगर असा एकाच विमानातून प्रवास केला असल्याचं आता समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp