पतीच्या हत्येसाठी पत्नीची जमीन विकण्याची तयारी, अनैतिक संबंधांसाठी संपवलं
muzaffarnagar crime news : मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी प्रवीण यांच्या हत्येप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. पतीच्या हत्येसाठी पत्नीने जमीन विकण्याची योजना आखली होती, तर प्रियकराने दोघांना प्रत्येकी 3 लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीच्या हत्येसाठी पत्नीची जमीन विकण्याची तयारी
अनैतिक संबंधांसाठी संपवलं
muzaffarnagar crime news : मुजफ्फरनगरमध्ये शेतकरी प्रवीण उर्फ परविंदर यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी 60 तासांत छडा लावलाय. परपुरुषासोबत असणारे प्रेमसंबंध आणि पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने हत्या घडवून आणल्याचा पोलिसांचा आरोप आहे. मुजफ्फरनगरच्या रतनपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबरपूर येथील जंगलात 27 सप्टेंबर रोजी 50 ते 52 वर्षीय शेतकरी प्रवीण उर्फ परविंदर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पुरावे आणि घटनाक्रमाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचले.
हेही वाचा : प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप, मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर
पती दारु पिऊन मारतो, त्रस्त होऊन प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय
या प्रकरणात पोलिसांनी मृत प्रवीण यांची पत्नी रेखा, तिचा प्रियकर विकास, राजा उर्फ काला आणि कल्याण सिंह यांना अटक केली आहे. सुरुवातीला या हत्येमागे बाहेरील व्यक्तीचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत असताना तपासाची दिशा मृताच्या घरातील व्यक्तींपर्यंत पोहोचली. पोलिसांच्या चौकशीत रेखा आणि कौटुंबिक परिचित विकास यांच्यात 2018-19 पासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले. रेखा आणि प्रवीण यांचा विवाह 2006 मध्ये झाला होता. चौकशीत रेखाने पती दररोज दारू पिऊन तिच्यासोबत मारहाण करत असल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे त्रस्त होऊन आणि विकाससोबत राहण्याच्या इच्छेने तिने पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले.
हेही वाचा : तलावात बुडून चिमुकल्याचा मृत्यू, आई-वडिलांचा एकमेकांवर संशय; आरोपी नेमका कोण?
