26 वर्षीय तरुण, 46 वर्षीय महिला हॉटेल रुममध्ये.., अन् 9 दिवसांनंतर मृतदेह सापडले

मुंबई तक

UP Crime News : बहराइचमधील हॉटेलच्या खोलीत 26 वर्षीय युवक आणि 46 वर्षीय महिलेचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. दोघे 22 सप्टेंबरपासून हॉटेलमध्ये राहत होते.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

26 वर्षीय तरुण.., 46 वर्षीय महिला आणि 9 दिवस

point

हॉटेल रुममध्ये लटकलेले मृतदेह

UP Crime News : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये हॉटेलच्या खोलीत एका युवकाचा आणि महिलेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. रिंकू नावाचा 26 वर्षीय युवक आणि पिंकी नावाची 46 वर्षीय महिला 22 सप्टेंबरपासून बहराइचमधील अवध कैलाश हॉटेलमध्ये मुक्कामी होते. तब्बल नऊ दिवस दोघे हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्यांच्या मृत्यूची घटना समोर आली. 

दोघांनी गळफास घेऊन केली आत्महत्या 

हॉटेलच्या खोलीत बराच वेळ कोणतीही हालचाल दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर खोली उघडण्यात आली असता दोघांचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिकदृष्ट्या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा : CJP Protest LIVE : ज्ञानेश कुमारांविरोधात मीम्स, शिवाजी पार्कात आंदोलक जमण्यास सुरुवात

ही घटना बहराइचच्या कोतवाली नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवध कैलाश हॉटेलमधील कमरा क्रमांक 201 मध्ये घडली. रिंकू हा मूळचा श्रावस्तीचा रहिवासी होता, तर पिंकी ही गौतमबुद्ध नगरची रहिवासी असून विवाहित असल्याचे सांगण्यात आले आहे. हॉटेलमध्ये खोली घेताना दोघांनी आपण खासगी नोकरी करत असून विभागीय कामासाठी बहराइचला आल्याचे सांगितले होते. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना खोली दिली.