CJP Protest LIVE : ज्ञानेश कुमारांविरोधात मीम्स, शिवाजी पार्कात आंदोलक जमण्यास सुरुवात

मुंबई तक

CJP Protest LIVE : सीजेपीच्या आंदोलनासाठी शिवाजी पार्कात सकाळपासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी, मीम्स आणि बॅनर्समधून निषेध व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

CJP Protest LIVE
CJP Protest LIVE
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ज्ञानेश कुमारांविरोधात मीम्स

point

शिवाजी पार्कात आंदोलक जमण्यास सुरुवात

CJP Protest LIVE : निवडणूक आयोग भोंगळ कारभार करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजीत दिपके आंदोलन पुकारलंय. शिवाजी पार्कात सीजेपीच्या आंदोलनाला दुपारी 4 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधीच सकाळपासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या शिवाजी पार्क परिसरात जमलेले आंदोलक ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात तयार करण्यात आलेले अनेक मीम्सही झळकले आहेत. मोठ्या बॅनर्सच्या माध्यमातून आंदोलकांकडून आपला विरोध व्यक्त केला जात आहे.

‘सेव्ह डेमॉक्रसी’, ‘गद्दार ज्ञानेश मस्ट गो’ अशा आशयाचे मोठे बॅनर आंदोलनस्थळी लावण्यात आले आहेत. या बॅनर्समधून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलकांनी भूमिका मांडली आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच शिवाजी पार्कात या घोषणाबाजी आणि बॅनर्समुळे वातावरण आंदोलनमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सीजेपीच्या या आंदोलनाला दुपारी 4 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच आंदोलकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, घोषणाबाजी आणि मीम्सच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर आणि मीम्स सध्या लक्ष वेधून घेत आहेत.