मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी दोन इंजेक्शन दिले, तरीही महिला जिवंतच राहिली, पुढं काय घडलं?

मुंबई तक

एका महिलेला वर्गमैत्रिणीच्या खूनाबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र मृत्यूदंड होऊनही ती महिला जिवंतच राहिली. नेमकं काय घडलं, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वर्गमैत्रिणीला जंगलात नेऊन संपवलं

point

आठवण म्हणून सोबत कवटी आणली

point

मृत्यूदंडावेळी घडला अजब प्रकार

Crime News : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. क्रिस्टा पाईक नावाच्या एका 50 वर्षीय महिलेला खून प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तिला शिक्षा देऊनही तिचा मृत्यू झालाच नाही. ही घटना आहे अमेरिकेतील टॅनेसी राज्यातील. बुधवारी (30 सप्टेंबर) तिला ही शिक्षा देण्यात आली होती. या राज्यात गेल्या दोन दशकात देण्यात आलेली ही पहिलीच मृत्यूदंडाची शिक्षा होती. त्यामुळे सर्वांचंच याकडे लक्ष लागलं होतं. मात्र मृत्यूदंडाचा हा प्रयत्न फसल्याने याची चर्चा सुरु झाली आहे. आधुनिक अमेरिकन मृत्युदंडाच्या इतिहासात किशोरावस्थेत केलेल्या गुन्ह्यासाठी टॅनेसीमध्ये फाशी दिली जाणारी पाईक ही एकमेव व्यक्ती ठरणार होती.

जंगलातू नेऊन वर्गमैत्रिणीची हत्या अन् कवटीची आठवण

जानेवारी 1995 मध्ये पाईक 18 वर्षांची असताना तिने तिच्यासोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा (कॉलीन स्लॅमर) खून केला होता. या गुन्ह्यात पाईकचा 17 वर्षीय बॉयफ्रेंड (टॅडारिल शिप) आणि अन्य एक साथीदार सामील होता. दोघांनी मिळून स्लॅमरला एका जंगलात नेलं आणि तिची निर्घृण हत्या केली. स्लॅमरच्या छातीवर त्यांनी पंचकोनी तारेने (Pentagram) वार केले होते. मात्र फक्त हत्या करुनच ती थांबली नाही. आठवण म्हणून स्लॅमरच्या कवटीचा भाग आठवण म्हणून पाईक सोबत घेऊन गेली. पोलीस तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण अमेरिका हादरली होती. पाईकच्या बाजूने युक्तीवाद करताना वकिलांनी तिच्या बालपणातील लैंगिक शोषण, मानसिक आजार (बायपोलर आणि PTSD) यांचा हवाला दिला होता.

हे ही वाचा : दुष्काळी तालुक्यांचे यादीतून वगळल्याने सत्ताधारी नेते नाराज, आता सरकारचा मोठा निर्णय

शिक्षेवेळी नेमकं काय घडलं?

बुधवारी तिच्या या शिक्षेची अंलबजावणी झाली. यासाठी तिला दोन प्राणघातक इंजेक्शन्स देण्यात आली. मात्र ती इंजेक्शन्स दिल्यानंतर काही वेळाने तिच्या घोरण्याचा आवाज येऊ लागला, असा दावा अमेरिकेतील एनबीसी न्यूजने केला आहे. तसेच या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीवेळी काही पत्रकारदेखील उपस्थित होते. पाईकचे घोरणे, मोठा श्वास घेणे आणि हातातील वेदनांबद्दलच्या तक्रारी ऐकू आल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, देवीची मूर्ती नेत असलेल्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर काय घडलं?

पुढं काय होणार?

पाईकला मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न फसल्यानंतर रुग्णवाहिका बोलावून तिला रुग्णालयात हलवण्यात आले. ही अंमलबजावणी अयशस्वी ठरल्यानंतर टॅनेसीच्या राज्यपालांनी या वर्षातील फाशीच्या सर्व शिक्षांना स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, याआधी देखील टॅनेसी राज्यात एका आरोपीला मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न फसला होता. अमेरिकेत महिलांना फाशी देण्याच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. 1976 मृत्युदंडाची शिक्षा पुन्हा सुरू झाल्यानंतर अमेरिकेत पार पडलेल्या 1,683 फाशींपैकी केवळ 18 महिला होत्या. टॅनेसी राज्याने आतापर्यंत 17 जणांना फाशी दिली आहे.