भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, देवीची मूर्ती नेत असलेल्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर काय घडलं?
समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. शेगावहून वर्ध्याला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
देवीची मूर्ती नेत असलेल्या भक्तांवर काळाचा घाला,
समृद्धी महामार्गावर काय घडलं?
Samruddhi Mahamarg Accident : अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वे परिसरात चॅनल क्रमांक 97 जवळ ट्रक आणि टेम्पो पिकअपचा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
अपघाताची माहिती मिळताच धामणगाव रेल्वे पोलीस, स्थानिक नागरिक आणि पत्रकारांच्या तत्परतेमुळे तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 4 ते 5 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, तर उर्वरित 14 ते 15 नागरिक किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : SIR प्रक्रियेतल्या त्रुटींवरून मुंबई हायकोर्टाने आयोगाने का झापलं?
अपघात कोणत्या परिस्थितीत घडला?
या दुर्घटनेचे वृत्त समजताच अमरावती ग्रामीण एसपी निकेतन कदम आणि धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या आरोग्याची पाहणी केली व डॉक्टरांना योग्य ते निर्देश दिले. हा अपघात नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये घडला याचा अधिक तपास पोलीस करत असून, मृतांची व जखमींची सविस्तर माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
हे ही वाचा : ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर मुंबईकरांचा संताप, SIR प्रक्रियेवर नागरिकांचे गंभीर सवाल
समृद्धी महाममार्गावर वारंवार अपघात
समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा भीषण अपघातांमुळे पुन्हा एकदा वाहनांचा वेगाचा आणि रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाविकांवर अशा प्रकारे काळाने घाला घातल्यामुळे बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
