SIR प्रक्रियेतल्या त्रुटींवरून मुंबई हायकोर्टाने आयोगाने का झापलं?
high court question to election commission : पत्ता बदललेल्या मतदारांचे फॉर्म 8 स्वयंचलित प्रणालीद्वारे नाकारले जात असल्याच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने निवडणूक आयोगाला सवाल केले. ‘एका व्यक्तीचा प्रश्न नाही, अशा हजारो आणि देशभरात लाखो मतदारांचा प्रश्न आहे’, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
SIR प्रक्रियेतल्या त्रुटींवरून मुंबई हायकोर्टाने आयोगाने का झापलं?
‘एका व्यक्तीचा प्रश्न नाही, अशा हजारो आणि देशभरात लाखो मतदारांचा प्रश्न आहे’
Goa Bench of the Bombay High Court questioned the Election Commission : ‘एका व्यक्तीचा प्रश्न सोडून द्या, आम्हाला त्याच्यासारख्या हजारो लोकांचा आणि देशाचा विचार केला तर लाखो लोकांचा प्रश्न समजून घ्यायचा आहे’, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने निवडणूक आयोगाला सवाल केला. पत्ता बदललेल्या मतदारांचे फॉर्म 8 निवडणूक आयोगाच्या ईसीआयनेट पोर्टलवरील स्वयंचलित प्रणालीद्वारे नाकारले जात असल्याच्या मुद्द्यावरून ही टिप्पणी करण्यात आली. जुन्या पत्त्यावर राहत नसलेल्या मतदाराने इन्युमरेशन फॉर्म भरला नसेल, तर त्याचे नाव मतदार यादीतून काढले जाते आणि त्यानंतर नवीन पत्त्यावर नाव नोंदवण्यासाठी भरलेला फॉर्म 8 देखील प्रणालीकडून नाकारला जात असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर आला. अशा परिस्थितीत मतदारांसमोर मोठी अडचण निर्माण होत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
हेही वाचा : Personal Finance: मोबाईल नंबर बंद झाला तर तुमचे पैसे अडकू शकतात का? एक छोटी चूक आणि मोठा त्रास!
गोव्यातील सांताक्रुज येथील एका कुटुंबाचा मुद्दा समोर
हे प्रकरण Paresh Salgaonkar & Ors v. State of Goa & Ors. या याचिकेशी संबंधित आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझिस आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत गोव्यातील सांताक्रुज येथील एका कुटुंबाचा मुद्दा समोर आला. या कुटुंबाने घर बदलले होते. एसआयआर प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जुन्या पत्त्यावर ते आढळले नाहीत आणि त्यांची नावं मतदार यादीतून काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी नवीन पत्त्यावर नाव नोंदवण्यासाठी फॉर्म 8 भरला. मात्र, हा अर्जही स्वीकारला गेला नाही. याचिकेच्या माध्यमातून याच प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला.
हेही वाचा : कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळे 180 प्रवाशांचे प्राण कसे वाचले? कसं आहे मुंबई कनेक्शन?
