कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळे 180 प्रवाशांचे प्राण कसे वाचले? कसं आहे मुंबई कनेक्शन?

मुंबई तक

दुबईवरुन तेल अविवला जाणाऱ्या विमानात को पायलटने मुख्य पायलटवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात भारताचे पायलट स्मित मच्छार जखमी झाले. 180 प्रवाशांना वाचवणाऱ्या मच्छार यांचे मुंबईशी देखील खास कनेक्शन आहे.

ADVERTISEMENT

Captain Smit Machchhar Mumbai Connection
Captain Smit Machchhar Mumbai Connection
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळे 180 प्रवाशांचे प्राण कसे वाचले?

point

कसं आहे मुंबई कनेक्शन?

Captain Smit Machchhar Mumbai Connection : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या विमानात को-पायलटने मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे. जॉर्डनच्या हवाई हद्दीत 34 हजार फुटांवर असताना आरोपी को-पायलटने पेन-नाईफच्या साहाय्याने कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला केला. यामुळे विमान थेट 17  हजार फुटांपर्यंत खाली आले. मात्र, अत्यंत गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेले असीम धैर्य आणि प्रसंगावधानामुळे विमानातील 150 इस्रायली नागरिकांसह एकूण 180 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले असून जगभरातून त्यांच्या या शौर्याचे कौतुक होत आहे.

दोरीने बांधून ठेवले

हल्ला झाल्यानंतर आरोपी को-पायलटचा विमान कोसळवण्याचा कट होता. परंतु, जखमी कॅप्टन मच्छार यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत सर्वप्रथम तांत्रिक अडचण आणि त्यानंतर विमान हायजॅक झाल्याचे आणीबाणीचे (इमर्जन्सी) कोड्स नियंत्रण कक्षाला पाठवले. यामुळे इस्रायली आणि सौदी अरेबियाच्या सुरक्षा यंत्रणा तात्काळ अलर्ट झाल्या. यानंतर मदत मिळावी म्हणून कॅप्टन यांनी कॉकपीटचा दरवाजा उघडला. कॉकपीटमध्ये मारामारी सुरू असल्याचे लक्षात येताच विमानात 'एअर मार्शल' म्हणून प्रवास करत असलेल्या इस्रायली गुप्तचर संस्था 'शिन बेथ'च्या अधिकाऱ्याने इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपी को-पायलटला पकडून दोरीने बांधून ठेवले.

हे ही वाचा : ऐन वेळेस भाजपची 'दोन' नावं ठरवली अवैध, शिंदेंच्या शिवसेनेकडून 'या' महापालिकेत करेक्ट कार्यक्रम

मुंबईशी काय कनेक्शन?

सुरक्षा यंत्रणा अलर्ट होताच इस्रायली एअरफोर्सने सहा फायटर जेट्स सौदी हवाई हद्दीत पाठवून विमानाला एस्कॉर्ट केले. कॅप्टन मच्छार यांनी गंभीर जखमी असतानाही अत्यंत कुशलतेने सौदी अरेबियातील तसुक विमानतळावर विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले. कॅप्टन मच्छार यांनी यापूर्वी स्पाईस जेटमध्ये 11 वर्षे सेवा बजावली असून त्यांच्याकडे 9,500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसराशीही त्यांचा संबंध राहिला आहे. इस्रायलने या घटनेची तुलना 9/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याशी करत कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा : Personal Finance: मोबाईल नंबर बंद झाला तर तुमचे पैसे अडकू शकतात का? एक छोटी चूक आणि मोठा त्रास!

हल्ल्यामागे कारस्थान?

या अभूतपूर्व शौर्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांना 'खरे नायक' (हीरो) संबोधत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता शेकडो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, आरोपी को-पायलटने हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने केला आणि यामागे काही आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे का, याचा सखोल तपास आता विविध आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून केला जात आहे.