ऐन वेळेस भाजपची 'दोन' नावं ठरवली अवैध, शिंदेंच्या शिवसेनेकडून 'या' महापालिकेत करेक्ट कार्यक्रम

मिथिलेश गुप्ता

Ulhasnagar Municipal Corporation, Nominated Corporators, BJP Shiv Sena Dispute, Ashwini Nikam, Rajesh Vadharia, Ulhasnagar Politics, Maharashtra Politics, Co-opted Corporators, BJP, Shiv Sena, Ulhasnagar News, eknath shinde, shirkant shinde, devendra fadnavis

ADVERTISEMENT

ulhasnagar nominated corporators bjp vs shiv sena dispute mayor ashwini nikam eknath shinde shirkant shinde devendra fadnavis
शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला दे धक्का!
Google CTA

उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजप आणि शिवसेनेमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बुधवारी सात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी भाजपच्या चारऐवजी दोन नावांची घोषणा केल्याने भाजपने या प्रक्रियेवरच आक्षेप घेतला आहे.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार वाद पाहायला मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली. मात्र, महासभेत झालेल्या घडामोडींवर भाजपने आक्षेप घेत महापौरांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा करत भाजपकडून न्यायालयात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करण्याचे सांगण्यात आले आहे. महापौरांनी मात्र भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

महासभेत महापौर अश्विनी निकम यांनी शिवसेनेकडून पंचम ओमी कालानी, हेमा पिंजानी, आशा पवार, रमेश चव्हाण आणि निलेश बोबडे यांची नगरसेवक म्हणून घोषणा केली. तर भाजपकडून धनंजय बोदारे आणि राजेंद्र श्रीखंडे उर्फ बाला यांची नियुक्ती करण्यात आली.

हे ही वाचा>> 'अजितदादांच्या घातपात प्रकरणी VSR ला वाचवणारा मफलरवाला नेता राज्यातीलच', रोहित पवारांचा प्रचंड मोठा गौप्यस्फोट

सर्वोच्च न्यायालयाने उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक पंधरा दिवसांच्या आत घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महासभेला सुरुवात होताच भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.