सांत्वनपर भेटीवेळी पुर्णेकरांच्या पत्नीने हंबरडा फोडला, उद्धव ठाकरेंचा मोठा शब्द
pradeep purnekar murder case : ठाण्यातील मानपाडा परिसरात प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. दरम्यान, या प्रकरणात आत्तापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांत्वनपर भेटीवेळी पुर्णेकरांच्या पत्नीने हंबरडा फोडला
उद्धव ठाकरेंचा मोठा शब्द
pradeep purnekar murder case : ठाण्यातील मानपाडा परिसरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू यशवंत पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरच्या रात्री हत्या झाली. पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तसेच त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. या प्रकरणात सुरुवातीला पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी पप्या शिंदे हा हल्ल्याच्या वेळी पूर्णेकर यांच्या कार्यालयातच उपस्थित होता. दरम्यान, आज या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
हेही वाचा : बनावट नावाने ओयो रुम घेतली अन् मध्यरात्री साधला डाव, महिला बँक कर्मचाऱ्यासोबत काय घडलं?
पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना संपूर्ण घटनाक्रम सांगितला
ठाणे गुन्हे शाखेने दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आरोपींनी हत्येच्या वेळी वापरलेल्या बाईकही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पूर्णेकर कुटुंबीयांनी उद्धव ठाकरेंना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
हेही वाचा : INDIA Meeting : राहुल गांधींसमोरच काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप, उद्धव ठाकरे काय म्हणाले?
