मुंबईची खबर : CNG चे दर पुन्हा वाढले, मुंबईकरांना महागाईचा झटका! जाणून घ्या बदलेले दर

मुंबई तक

मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एप्रिलपासून सातत्याने या दरात वाढ सुरु आहे.

ADVERTISEMENT

Mumbai CNG Price Hike
Mumbai CNG Price Hike
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सीएनजीचे दर पुन्हा वाढले

point

मुंबईकरांना महागाईचा झटका!

point

जाणून घ्या बदलेले दर

Mumbai CNG Price Hike : मुंबईत सीएनजीच्या (CNG) दरांमध्ये सातत्याने वाढ होत असून, 1 ऑक्टोबरपासून सीएनजी आणखी 1 रुपयाने महागला आहे. या ताज्या दरवाढीनंतर मुंबई आणि लगतच्या परिसरामध्ये सीएनजीचा नवा दर 89 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात तब्बल 8 रुपये प्रति किलोने वाढ झाली असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना आणि वाहनचालकांना हा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

या सततच्या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून, त्यांच्यावरील इंधनाचा रोजचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. हा खर्च असाच वाढत राहिल्यास भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा दबाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ वाहनचालकच नव्हे, तर रिक्षा-टॅक्सीने दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशालाही या दरवाढीची झळ बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

हे ही वाचा : प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप, मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर

महानगर गॅस लिमिटेडचे स्पष्टीकरण

महानगर गॅस लिमिटेडने (MGL) दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये झालेली वाढ याला कारणीभूत आहे. कंपनीला आयात कराव्या लागणाऱ्या रिगॅसिफाईड लिक्विफाईड नॅचरल गॅसच्या (RLNG) खरेदीचा खर्च वाढला आहे, कारण त्याचे दर आंतरराष्ट्रीय निर्देशांकांवर थेट अवलंबून असतात. त्यामुळेच वाढलेल्या इनपुट खर्चाचा भार कमी करण्यासाठी सीएनजीचे दर वाढवणे कंपनीला भाग पडत आहे.

हे ही वाचा : Govt Jobs : पदवीधरांसाठी सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी, कसा कराल अर्ज?

या वर्षातील पाचवी दगवाढ

या वर्षातील सीएनजीच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. एप्रिलपासून दरवाढ सातत्याने सुरू असून, 12 एप्रिल रोजी 1 रुपया, 14 मे रोजी 2 रुपये आणि 30 मे रोजी पुन्हा 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर 1 सप्टेंबरला 2 रुपयांनी तर आता 1 ऑक्टोबरला 1 रुपयाने सीएनजी महागला आहे. या पाचही टप्प्यांत मिळून गेल्या सहा महिन्यांत सीएनजीमध्ये तब्बल 8 रुपयांची वाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.