Govt Jobs : पदवीधरांसाठी सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी, कसा कराल अर्ज?

मुंबई तक

पदवीधरांसाठी सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी चालून आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर आहे. या पदांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Supreme Court Recruitment
Supreme Court Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांसाठी सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी

point

कसा कराल अर्ज?

Supreme Court Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी समोर आली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने 'ज्युनियर कोर्ट असिस्टंट' (Junior Court Assistant) या पदांच्या एकूण 250 जागा भरण्यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे सेवा बजवावी लागणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी (Graduate) असणे आवश्यक आहे. याशिवाय संगणकावर इंग्रजी टायपिंगचा ताशी 35 शब्द प्रतिमिनिट (35 wpm) वेग आणि संगणक हाताळणीचे मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, 1 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली असून SC/ST उमेदवारांना 5 वर्षे तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट लागू राहील.

हे ही वाचा : प्रदीप पुर्णेकरांची कॉन्ट्रॅक्ट किलिंग झाल्याचे आरोप, मिनाक्षी शिंदे यांचे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर

पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी दिली जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार या पदासाठी 'लेव्हल 6' (Level 6) ची वेतनश्रेणी लागू असेल, ज्यामध्ये सुरुवातीचे मूळ वेतन 35,400 रुपये प्रतिमहिना आणि त्यासोबत इतर सर्व सरकारी भत्तांचा समावेश असेल. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून सर्वसाधारण (General) वर्गातील उमेदवारांसाठी 1500 रुपये, तर SC/ST/OBC/PWD आणि माजी सैनिकांसाठी (ExSM) 750 रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी दोन इंजेक्शन दिले, तरीही महिला जिवंतच राहिली, पुढं काय घडलं?

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 7 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे; तर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आणि अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचून आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी www.sci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.