Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) नुसार 15 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सध्या राज्यातील हवामान पाहता, अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हवामान विभागाच्या अंदाजाविषयी माहिती नमूद करण्यात आली आहे, ती पुढीलप्रमाणे:
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pune crime : लोखंडी रॉडसह फावड्याने तरुणाला अमानुष मारहाण, नंतर हल्लेखोर स्वत:हून पोलिसांकडे गेले अन्...
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भाग :
भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टी, विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला. तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असेल असा हवामानाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. तसेच या भागातील पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भ भाग :
विदर्भातील विशेषतः नागपूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. भंडारा यासारख्या जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील लातूर, बीड आणि परभणी येथे मध्यम पावसासह विजांचा कडकडाट आणि 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज बांधला. तसेच बीड, परभणी, हिंगोली, जालना, नांदेडमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा : जळगाव हादरलं ! कॅफेत मैत्रिणीसोबत बसला सुलेमान, जमाव आला अन् गुरासाखं मारलं, आई-वडील सोडवायला गेले अन्...
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर या भागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबाबरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
