Arjun Tendulkar Engagement: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने खाजगी पद्धतीने सानिया चंडोकशी साखरपुडा केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तरुण आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटूने वैयक्तिक आयुष्यात इतकं मोठं पाऊल उचलल्याने सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. अद्याप अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या कुटुंबियांकडून या बातमीबाबत कोणतंच अधिकृत विधान समोर आलेलं नाही.
ADVERTISEMENT
अर्जुनची तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया यापूर्वीही बऱ्याचदा अर्जुन आणि त्याची बहिणीसोबत दिसली आहे.
सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे असून ते इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी आईस्क्रीम कंपनीचे मालक आहेत.
सानिया चंडोकचं इंस्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट असून तिचे इंस्टाग्रामवर 805 फॉलोअर्स आहेत. तिच्या फॉलोइंग लिस्टमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि त्याची बहीण सारा तेंडुलकर यांचा समावेश आहे.
सानिया चंडोक ही एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील असून ती आतिथ्य, अन्न आणि आईस्क्रीमसह विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी ओळखली जाते.
सानियाला WVS कडून पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून सर्टिफिकेट मिळालं आहे. तिने ABC प्रोग्राम पूर्ण केला असून ब्रँडच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजनुसार, ती मिस्टर पॉज नावाच्या पाळीव प्राण्यांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या ब्रँडची संस्थापक देखील आहे.
सानिया आणि अर्जुनच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळतंय. रिपोर्टनुसार, सानियाचे कुटुंबीय इंटरकॉन्टिनेंटल होटल आणि ब्रुकलिन क्रीमरीचं मालक असल्याचं सांगितलं जात आहे.
सचिन तेंडुलकरची जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असल्याची माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांची संपत्ती सुमारे 1500 कोटी रुपये आहे.
आयपीएलमध्ये 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणारा अर्जुन क्रिकेटमध्ये ऑलराउंडर म्हणून ओळखला जातो. अर्जुनने क्रिकेटमध्ये 2018 साली श्रीलंकेविरुद्ध 19 वर्षांखालील गटात पदार्पण केलं. अर्जुन इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय नसल्याचं पाहायला मिळतं.
अर्जुन आणि सानियाचं लव्ह मॅरेज असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. रिपोर्ट्सनुसार, सानिया ही सारा तेंडुलकरची चांगली मैत्रीण आहे असून तिनेच अर्जुन आणि सानियाची ओळख करून दिली होती.
ADVERTISEMENT
