India Independence History : 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री, दिल्लीत प्रत्येक ठिकाणी वेगळीच परिस्थिती निर्माण झाली होती. एकीकडे स्वातंत्र्याचा उत्साह होता. तर दुसरीकडे फाळणीचं दु:ख आणि हिंसाचार होण्याची भिती होती. हा फक्त एक दिवस नव्हता..तर जवळपास 200 वर्षांच्या गुलामीनंतर एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. घड्याळाची प्रत्येक टीक टीक इतिहास निर्माण करत होती. त्या रात्री जे काही घडलं, ते फक्त एक समारोप नव्हता, तर एका राष्ट्राच्या पुर्नजन्माची साक्ष होती.
ADVERTISEMENT
14 ऑगस्टच्या रात्री इंग्रजांनी भारताकडे सत्ता सोपवली अन्..
14 ऑगस्ट 1947 च्या रात्री, दिल्लीत प्रत्येक ठिकाणी वेगळंच चित्र निर्माण झालं होतं. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये वातावरण तापलं होतं. त्यावेळी आजचं संसद भवनाचं सेंट्रल हॉलच कॉन्स्टिट्यूशन हॉल असायचं. तेव्हा भारताचे विधान परिषदेचे सदस्य एका ऐतिहासिक बैठकीसाठी एकत्र येत होते. त्यावेळी बाहेर मुसळधार पाऊस सुरु होतं. पण लोकांचा उत्साह कमी होत नव्हता.
हजारो लोक कॉन्स्टिट्यूशन हॉलच्या बाहेर पावसात भिजून या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार साक्षीदार बनण्यासाठी एकत्र जमले होते. संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच ब्रिटीश सरकारचा 'यूनियन जॅक' झेंडा उतरवण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी तिरंगा फडकवण्याची तयारी सुरु होती. रात्री 11 वाजता बैठक घेण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद त्या बैठकीचे अध्यक्ष होते. बैठकीत सर्व नेत्यांनी त्यांचे विचार मांडले होते. त्यानंतर रात्री 12 वाजता जेव्हा जगातील सर्व लोक झोपेत होते, तेव्हा भारतानं स्वातंत्र्यदिन साजरा केला. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक भाषण केलं.
हे ही वाचा >> 'इतकी' सुंदर दिसते अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी! 'या' लेटेस्ट फोटोंमध्ये पाहा झलक
नेहरू यांच्या भाषणाला 'ट्रिस्ट विद डेस्टिनी' या नावानं ओळखलं जातं. या भाषणात त्यांनी म्हटलं होतं, अनेक वर्षांपूर्वी आम्ही नियतीला एक वचन दिलं होतं. पण आता ती वेळ आली आहे, जेव्हा आम्ही ते वचन पूर्णपणे नाही, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण करू. या भाषणामुळे भारताच्या लोकांच्या हृदयात एक नवी आशा आणि उत्साह भरला होता.
या समारोप समारंभात ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवली. हा एक आनंदी क्षण होता. पण त्यावेळी लॉर्ड माउंटबेटनही चिंताग्रस्त होते. कारण त्यांना माहित होतं की, एकीकडे भारत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये, पंजाब आणि बंगालसारख्या राज्यांमध्ये फाळणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्य दिन साजरं केलं होतं.
देशातील इतिहासात 14 ऑगस्टचा दिवस अत्यंत भावनिक पद्धतीचा होता, अशी नोंद करण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला एक पृथक राष्ट्र घोषिक करण्यात आलं. या विभाजनात भारताच्या फक्त उप-महाद्वीपांचे दोन तुकडे झाले नाहीत, तर बंगालचं विभाजनही करण्यात आलं. त्यानंतर बंगालच्या पूर्व विभागाला वेगळं करून पूर्व पाकिस्तान बनवण्यात आलं.
हे ही वाचा >> अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?
मध्य रात्री स्वातंत्र्य का मिळालं नाही?
पहिलं कारण होतं की, भारत आणि पाकिस्तानची फाळणी. त्यावेळच्या बड्या नेत्यांना आणि इंग्रजांना भीती होती की, जर दिवसा स्वातंत्र्य दिलं आणि भारत-पाकिस्तानचं विभाजन केलं, तर यामुळे दंगली भडकू शकतात. कायदेशीर व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणं खूप कठीण होईल. यामुळे मध्य रात्रीची वेळ देण्यात आली.
ADVERTISEMENT
