अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली आहे. आता जिच्यासोबत अर्जुनचं लग्न ठरलं, ती सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे.

सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?
सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा झाला साखरपुडा

point

जिच्यासोबत ठरलं अर्जुनचं लग्न ती सानिया चंडोक आहे तरी कोण?

Arjun Tendulkar Engagement: क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली आहे. हा सोहळा अत्यंत साध्या आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्र उपस्थित होते. आता जिच्यासोबत अर्जुनचं लग्न ठरलं, ती सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. 

प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंब

खरंतर, सानिया मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातून असल्याचं सांगितलं जात आहे. ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. सानिया म्हणजेच अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये नियुक्त भागीदार आणि संचालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सानिया ही अर्जुन तेंडुलकरची बालपणीची मैत्रीण आहे. 

मुंबईतील मोठ्या उद्योगपतींमध्ये नाव 

सानियाने लंडनमधील स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आहे. तसेच, सानियाचं प्राण्यांवर विशेष प्रेम असून ती अॅनिमल लव्हर असल्याचं सांगितलं जात आहे. सानियाचं कुटुंब मुंबईतील मोठ्या उद्योगपतींमध्ये गणलं जातं. तिचे आजोबा रवी घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि कमी कॅलरी असलेल्या ‘ब्रुकलिन क्रीमरी’ या आइस्क्रीम ब्रँडचे मालक आहेत.

हे ही वाचा: सचिन तेंडुलकर सासरा होणार, सूनबाईंची चर्चा तर... ‘या’ तरुणीने काढली अर्जुनची विकेट!

अर्जुनचं क्रिकेट करिअर 

सध्या, अर्जुनचा सानियासोबत साखरपुडा झाल्यामुळे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आनंद साजरा करत असला तरी त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये थोडीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय . नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 मध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स (एमआय) कडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर रिटेन केले होते पण तो संपूर्ण सिझनमध्ये बेंचवरच राहिला असल्याची माहिती आहे.  

हे ही वाचा: ऐकावं ते नवलंच! एका रात्रीत पळून गेल्या तीन मैत्रिणी... एक बनली नवरी, दुसरी नवरा तर तिसरी दीर... नेमकी घटना काय?

अर्जुन आणि सानिया कधी लग्न करणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. अर्जुनने अद्याप त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या साखरपुड्याचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp