सचिन तेंडुलकर सासरा होणार, सूनबाईंची चर्चा तर... ‘या’ तरुणीने काढली अर्जुनची विकेट!

मुंबई तक

Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा 13 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत एका खाजगी समारंभात पार पडला. अर्जुनचा साखरपुडा मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोक यांच्याशी झाला आहे. हा सोहळा अत्यंत साध्या आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्र उपस्थित होते. ही बातमी सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये वाऱ्यासारखी पसरली असून, तेंडुलकर कुटुंबाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

- सानिया चांडोक कोण आहे?  

सानिया चांडोक ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हे हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहे. रवी घई हे इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि कमी कॅलरी असलेल्या ‘ब्रुकलिन क्रीमरी’ या आइस्क्रीम ब्रँडचे मालक आहेत. सानिया ही अर्जुनची बालपणीची मैत्रीण असल्याचे सांगितले जाते, आणि ती सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही.
  
- सोहळ्याचे स्वरूप:

  हा साखरपुडा सोहळा थाटामाटात नसून, साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. दोन्ही कुटुंबांनी या खास क्षणाला गुप्तता राखली, आणि कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप जारी केलेले नाही. इंडिया टुडे आणि इतर काही माध्यमांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp