Maharashtra Weather: राज्यात हवामान विभागाने 10 ऑक्टोबर रोजी पावसाची सामान्य स्थिती असेल. तसेच राज्यातील भारतीय विभागातील (IMD) अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हावामानाच्या एकूण अंदाजाबाबत महत्वाची अपडेट पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे हादरलं! दोघेही एकत्र दारू प्यायले, नंतर वाद झाला, गर्लफ्रेंडची सटकली आणि बॉयफ्रेंडलाच...
कोकण :
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज जारी केला आहे. यापैकी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. थोडक्यात पावसाची स्थिर स्थिती असणार आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : नवरा होता शारीरिकदृष्ट्या कमजोर, दीराकडून शरीरसुखाची मागणी, महिलेनं विरोध करताच हुंडा अन्... भयंकर कांड समोर
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
विदर्भ :
राज्यातील विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज जारी केला.
ADVERTISEMENT
